26.6 C
New York

Amit Shah : दहशतवादाला खोलवर गाडून टाकू अन्…, अमित शहांचा काश्मीरमध्ये शब्द

Published:

सध्या संपूर्ण देशात हरियाणा (Haryana) आणि जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे (Assembly Election 2024) सर्वांचे लक्ष लागून आहे. आज देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी जम्मू-काश्मीमध्ये किश्तवाडा मतदारसंघात एका सभेमध्ये बोलताना आम्ही फाळणीचे दिवस पाहिले आहे, 1990 मध्ये दहशतवादाचे दिवस पाहिले आहे. चंद्रिका शर्मा असो वा परिहार बंधू… प्रत्येकाने त्याग केला आहे असं या सभेत बोलताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले.

पुढे बोलताना अमित शहा म्हणाले की, मी आज जम्मू-काश्मीरच्या जनतेला वचन देतो, आम्ही दहशतवादाला इतका खोलवर गाडून टाकू की तो कधीही बाहेर येणार नाही. 1990 प्रमाणे आज देखील येथे दहशतवादाला बळ देण्याचे काम सुरु आहे. काँग्रेस (Congress) आणि नॅशनल कॉन्फरन्सने (National Conference) जर त्यांची सरकार आली तर आम्ही काही दहशतवाद्यांना सोडणार असे आश्वासने दिले आहे. असेही यावेळी ते म्हणाले.

तसेच देशात नरेंद्र मोदींची सरकार (Modi Government) आहे त्यामुळे देशात आता कोणीही दहशतवाद पसरवण्याची हिंमत करत नाही. मोदीजींनी कलम 370 हटवले त्यामुळे आता भारतीय राज्य घटनेत कलम 370 ला स्थान नाही असेही यावेळी अमित शहा म्हणाले.

आमची सरकार आणा, उद्धव ठाकरेंची कर्मचाऱ्यांना ग्वाही

जम्मू काश्मीरमध्ये दोन संविधान आणि दोन ध्वज असणार नाही. ध्वज फक्त तिरंगा असणार. यावेळी जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक स्पष्टपणे दोन शक्तींमध्ये आहे. एका बाजूला नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला भाजप आहे.

नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचे म्हणणे आहे की, जर आमची सरकार आली तर कलम 370 परत आणू परंतु आज पहाडी आणि गुर्जर बांधवांना जे आरक्षण मिळाले आहे ते कलम 370 शिवाय मिळू शकले नसते. त्यामुळे एकीकडे त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी बनवायचे आहे तर मोदींना ‘विकसित काश्मीर’ बनवायचे आहे. असेही यावेळी अमित शहा म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img