26.9 C
New York

India vs Bangladesh : …तरी कसोटी खेचून आणण्याचा आमचा प्रयत्न; बांगलादेशच्या कर्णधाराचा इशारा

Published:

भारत विरुद्ध बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यामध्ये १९ सप्टेंबरपासून मालिकेला सुरुवात होणार आहे, बांग्लादेशच्या संघाची भारताविरुद्ध मालिकेसाठी घोषणा करण्यात आली आहे, कर्णधार शांतोच्या नेतृत्वाखाली यामध्ये बांग्लादेशचा संघ मैदानात उतारनार आहे. बांग्लादेशच्या संघाने काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या संघाला २-० ने पराभूत करून कसोटी मालिका नावावर केली होती. भारत बांग्लादेश यांच्यामध्ये २ सामान्यांची कसोटी मालिका आणि ३ सामान्यांची T२० मालिका आयोजित करण्यात आली आहे. पहिला सामना १९ सप्टेंबरपासून होणार आहे. बांग्लादेशने मालिका एकतर्फी जिंकल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास नक्कीच गगनात असेल, त्यामुळे ते भारतासाठी आव्हान उभे करून शकतात.

जोरदार स्वागत बांगलादेशी खेळाडू हॉटेलमध्ये पोहोचल्यावर त्यांचे करण्यात आले. नझमुल हसन शांतोच्या नेतृत्वाखालील बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर राहतील आणि प्रोटोकॉलनुसार सशस्त्र सुरक्षा कर्मचारी तेथे उपस्थित असतील. गेल्या महिन्यापासून वास्तविक बांगलादेश अशांततेच्या काळातून जात आहे. मात्र, असे असतानाही बांगलादेश क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा केला. बांगलादेशने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-0 असा ऐतिहासिक विजय नोंदवला. टीम इंडियाला त्याचबरोबर आता बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू आव्हान देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

भारताला रवाना होण्यापूर्वी बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसैन शांतोने आपल्या रणनीतीवर प्रतिक्रिया दिली. नझमुल हुसेन शांतो म्हणाला की, भारत आमच्यापेक्षा चांगला संघ आहे, टीम इंडियाची क्रमवारी आमच्यापेक्षा चांगली आहे, याबाबत आम्हाला कल्पना आहे. परंतु आमचा प्रयत्न शेवटच्या दिवसापर्यंत कसोटी खेचून आणण्याचा आणि भारतीय संघाला सहज जिंकू न देण्याचा असेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img