26.6 C
New York

Eknath Shinde : जागा वाटप, निवडणुकांचे टप्पे अन् अजितदादांचा…; CM शिंदेंनी सगळं सांगून टाकलं

Published:

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आमचा लोकसभेला स्ट्राईक रेट चांगला होता म्हणत विधानसभेसाठी आम्हाला 100 जागा द्या अशी मागणी केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर आता शिंदेंनी विधानसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्मुला काय असणार यावर थेट भाष्य करत दंड थोपटले आहेत. वर्षा या त्यांच्या निवासस्थानातील पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जागावाटपावर भाष्य केले. (CM Eknath Shinde On Maharashtra Vidhansabha Election)

Eknath Shinde स्ट्राईक रेट आणि क्षमता हेच जागा वाटपाचे सूत्र असणार

विधानसभेच्या जागा वाटपाबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, स्ट्राईक रेट आणि क्षमता हेच जागा वाटपाचे सूत्र असणार असून, येत्या 8 ते 10 दिवसांत जागावाटप पूर्ण कऱणार असल्याचेही शिंदेंनी सांगितले. विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यात होणार असल्याचा अंदाज व्यक्त करत नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आगामी विधानसभा निवडणूक होईल असा अंदाजही शिंदेंनी वर्तविला आहे.

Eknath Shinde उमेदवारी कशी दिली जाणार?

वर्षावरील अनौपचारिक गप्पांमध्ये शिंदेंनी विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपाबाबतही भाष्य केले. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीला उमेदवार निवडताना सर्वेक्षणाचा आधार घेण्यात येणार आहे. यासाठी तिनही पक्षांच्या सर्वेक्षणाचा विचार करून जागा आणि उमेदवारी दिली जाणार आहे.

जरांगे अन् माझे चांगले संबंध, त्यांनी मुंबईत यावे चांगला शेवट करू; शिंदेंच्या शिलेदारीची ग्वाही

Eknath Shinde अजितदादांच्या गुलाबी रंगावरही केलं भाष्य

वर्षा बंगल्यावरली गप्पांदरम्यान एकनाथ शिंदेंनी अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटवरही भाष्य केले.

Eknath Shinde अजितदादांकडूनही जोरदार मागणी

तर, दुसरीकडे लोकसभा निवडणुकीला फटका बसलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही महायुतीकडे आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभेसाठी 80 ते 90 जागा मागितल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. जागा वाटपाच्या चर्चांमध्ये मी जास्त लक्ष घातल नसून, अजितदादा, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंची याबाबत चर्चा होत असते असेही भुजबळ म्हणाले. या नेत्यांनी नेमक्या किती जागा मागितल्या याबाबत ठोस माहिती नाही पण साधाऱ ण80 ते 90 जागा मागितल्या आहेत. आता यावर का निकाल येतो याबाबत मला कल्पना नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img