लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, पण पक्ष आणि विचारधारेसाठी मी तो प्रस्ताव नाकारला, असा धक्कादायक गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. नागपूरमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा गौप्यस्फोट केलाय. नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण एक व्यक्ती मला म्हणाला होता, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत. (Nitin Gadkari) त्यांच्या या वक्तव्यानंतर देशाच्या राजकारणात चर्चेला उधान आलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमुळे सर्वच नेते मोर्चेबांधणीच्या तयारीला लागले आहेत. त्यातच काल नागपुरात एक कार्यक्रम पार पडला.
मी म्हणालो की, तुम्ही मला का पाठिंबा द्याल आणि मी तुमचा का पाठिंबा घेऊ? पंतप्रधान होणं हे काही माझ्या आयुष्याचं ध्येय नाही. मी माझ्या संस्थेशी प्रामाणिक आहे. ज्याच्यावर श्रद्धा माझी आहे त्यासाठी मी कोणताही त्याग करायला तयार आहे. माझी श्रद्धा हीच देशाच्या लोकशाहीचे सर्वात मोठं बलस्थान आहे असं आपण त्या व्यक्तीला बोलल्याचंही नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं.
भाजप मोठा भाऊ! शिवसेना,अजितदादा गटाला सोबत घेऊनच लढा; नड्डांच्या सूचना
Nitin Gadkari राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
नितीन गडकरींनी सांगितलेल्या या किस्स्यानंतर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. नितीन गडकरींची तसेच पुन्हा एकदा पंतप्रधानपदासाठी चर्चा सुरु झाली आहे. 2014 पासून नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त भाजपमध्ये इतर कोणीही पंतप्रधानपदासाठी दावा केलेला नाही. यामुळे नरेंद्र मोदी यांच्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान कोण होणार याची चर्चा पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्यानंतर योगी आदित्यनाथ, अमित शाह यांची नावे पंतप्रधानपदासाठी चर्चेत असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावर आता नितीन गडकरी यांच्या नावाची भर पडली आहे.