26.9 C
New York

Neeraj Chopra : नीरजचा नेम अवघ्या 1 सेंटीमीटरने चुकला, सुवर्णपदक हुकले

Published:

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) डायमंड लीग फायनलमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले. याशिवाय, लाखो भारतीय चाहत्यांसाठी एक मोठा धक्का म्हणजे नीरज चोप्राचे सुवर्णपदक केवळ एक सेंटीमीटरने हुकले.

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्यपदक विजेत्या नीरजने डायमंड लीग 2024 च्या अंतिम फेरीत 87.86 मीटरची सर्वोत्तम थ्रो करून रौप्यपदक जिंकले. ग्रेनेडाच्या पीटर्स अँडरसनने 87.87 मीटर भालाफेकसह सुवर्णपदक जिंकले. खरे तर ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. कारण दुखापत होऊनही, नीरज चोप्रा डायमंड लीग 2024 च्या फायनलमध्ये लढला आणि फक्त 1 सेंटीमीटरने सुवर्णपदक जिंकण्यापासून दूर राहिला.डायमंड लीग 2024 च्या फायनलमध्ये नीरज चोप्रा आणि पीटर्स अँडरसन यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. प्रत्येक थ्रोनंतर स्पर्धा अधिकच रोमांचक होत गेली. भारताच्या नीरजने पहिल्याच प्रयत्नात 86.82 मीटर फेक केली.

त्यानंतर नीरज चोप्राचा दुसरा प्रयत्न काही विशेष झाला नाही आणि त्याने ८३.४९ मी. त्याचा सर्वोत्तम थ्रो तिसऱ्या प्रयत्नात आला आणि तो 87.86m होता आणि तो अँडरसनच्या जवळ होता पण 1cm कमी होता. त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img