26.6 C
New York

Sanjay Raut : ‘आनंद दिघे असते तर चाबकाने फोडले असते’, ‘त्या’ प्रकारावर राऊतांचा संताप

Published:

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आनंद आश्रमात (Anand Ashram) कार्यकर्त्यांना नोटा उधळल्याचा प्रकार समोर आला होता. गणपती विसर्जनादरम्यान, आनंदा आश्रमात कार्यकर्त्यांनी ढोलताशांवर नोटा उधळल्या. आनंद आश्रमातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून थेट एकनाथ शिंदे यांच्यावर टीका सुरू झाली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या प्रकारावर घणाघाती टीका केली आहे. आज जर आनंद दिघे असते तर त्यांना चाबकाने फोडून काढले असते असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी संबंधितांवर कारवाई केली जाईल असे सांगितले होते. त्यानुसार शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्यावतीने (Thane News) एक पत्रक जारी करण्यात आले आहेत. त्यात दोन शिवसेना पदाधिकाऱ्यांची शिवसेना पक्षातील शाखाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली.

भाजप मोठा भाऊ! शिवसेना,अजितदादा गटाला सोबत घेऊनच लढा; नड्डांच्या सूचना

संजय राऊत पुढे म्हणाले, शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आनंद आश्रमात (Anand Ashram) कार्यकर्त्यांना नोटा उधळल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकारावर राऊतांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. कारवाई, पदावरून काढणे, खुलासे आणि माफ्या ही सर्व नौटंकी असते. मुळात तुमची संस्कृती आणि विकृती राज्यकर्ता म्हणून राजकारणात काय आहे? जर आज आनंद दिघे असते तर हे आतमध्ये घुसलेले जे लेडीज बार वाले होते, मिंधे सेनेचे लोकं होते त्यांना आणि त्यांच्या बॉसला चाबकाने फोडून काढलं असते.

कुठली संस्कृती ठाण्यामध्ये आली एक तर तुम्ही आनंद आश्रमाचा बेकायदेशीर ताबा घेतला. मुळात ती शिवसेनेची प्रॉपर्टी आहे आनंदी दिघे यांची प्रॉपर्टी आहे. आनंद दिघे म्हणजे तुमचे खासगी नाही. ठाण्यातील लोकांची मान शरमेने खाली जाईल अशा प्रकारचे कृत्य तुम्ही केलं आहे. मिंधेसेनेचे जे वरचे सरदार आहेत ही त्यांची संस्कृती आहे. त्यामुळे आता कोण माफी मागत असेल पदावरून काढलं जात असेल तर ही पूर्णपणे नौटंकी आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img