21 C
New York

Mumbai Local : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! दर अडीच मिनिटांनी लोकल ट्रेन

Published:

लोकल ट्रेन म्हणजे मुंबईची लाईफलाईन (Mumbai Local) समजली जाणारी नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मुंबई उपनगर, ठाणे, अंबरनाथ, नवी मुंबई, बदलापूर परिसरातील बहुतांश चाकरमान्यांना आपले कार्यालय गाठण्यासाठी लोकल ट्रेनवर अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे मुंबईकरांचं आयुष्य लोकल ट्रेनच्या तालावर धावतं, असं म्हटल्यासही वावगं ठरणार नाही. (Mumbai Local) मात्र, लोकल ट्रेनचे गेल्या काही वर्षांमध्ये कोलमडणारे वेळापत्रक, तांत्रिक बिघाड हे चित्र सामान्य झालं आहे. परंतु, लवकरच हे चित्र बदलण्याची शक्यता आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच मुंबई दौरा केला. यावेळी त्यांनी लोकल ट्रेनसाठीच्या नव्या प्रणालीविषयी भाष्य केलं. तांत्रिक अडचणी दूर करत रेल्वे मार्गावरील तिन्ही मार्गांवरील लोकल ट्रेन्सना कवच प्रणालीबरोबर कम्बाईन कम्युनिकेशन्स बेस्ड कंट्रोल ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) यंत्रणेशी जोडलं जाणार आहे. त्यामुळे दोन लोकलमधील वेळेचं अंतर 180 सेकंदांवरुन 150 सेकंदांपर्यंत (अडीच मिनिटे) कमी होणार आहे. अशाप्रकारची यंत्रणा लाभणारे मुंबई हे पहिलंच शहर ठरणार आहे. येत्या तीन वर्षात लोकल फेऱ्यांची संख्या सीबीटीसी प्रणालीमुळे दुप्पट होईल, असा दावा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून करण्यात आला.

नितीन गडकरींचा खळबळ उडवणारा गौप्यस्फोट

Mumbai Local 350 नव्या एसी लोकल

मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेसाठी 350 नव्या एसी लोकल विकत घेण्यासंदर्भात रेल्वेकडून निविदा काढली जाणार आहे. राजकीय विरोधामुळे मात्र, एसी ट्रेनला असणाऱ्या ही प्रक्रिया थांबल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. मात्र, प्रवाशांची संख्या एसी ट्रेनमध्ये वाढत असल्याने उपनगरी रेल्वे मार्गावर एसी ट्रेन्सची संख्या वाढवण्यात येईल.

Mumbai Local आजचा मेगाब्लॉक रद्द

गणेशदर्शनानिमित्त रविवारी मुंबईत मोठ्याप्रमाणावर भाविक येणार असल्याने मध्य रेल्वेने आजचा मेन लाईनवरचा नियमित मेगाब्लॉक रद्द केला आहे. तथापि, हार्बर मार्गावर मात्र सकाळी 9.40 ते सायंकाळी 4.51 या वेळेत दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचं कळवण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img