8.3 C
New York

Sanjay Raut : गडकरींना PM पदाची ऑफर? राऊत म्हणतात, ‘गडकरींच्या वक्तव्यात काही…’

Published:

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा गौप्यस्फोट केलाय. नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण एक व्यक्ती मला म्हणाला होता, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत. (Nitin Gadkari) त्यांच्या या वक्तव्यानंतर देशाच्या राजकारणात चर्चेला उधान आलं आहे. विरोधकांकडूनही प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही गडकरींच्या या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. गडकरींच्या वक्तव्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, नितीन गडकरी हे भाजपमधी सर्वमान्य नेते आहेत. पंतप्रधानपदासाठी तडजोड करा असं त्यांना कुणी सांगितलं असेल असं मला वाटत नाही. या देशात हुकूमशाही आणि एकाधिकारशाही सुरू आहे. दहा वर्षांपासून देशात ज्या पद्धतीने आणीबाणी लावण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्याशी तडजोड करू नका अशी भूमिका विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांच्याकडे मांडली असेल तर त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही.

नितीन गडकरींचा खळबळ उडवणारा गौप्यस्फोट

आज जे सरकारमध्ये बसून सध्याच्या या देशातल्या मूल्यांशी तडजोड करत आहेत, लोकशाही असेल, स्वातंत्र्य असेल, न्यायपालिका असेल तो एक राष्ट्रीय अपराध आहे असे मी मानतो. नितीन गडकरी या सगळ्यांच्या विरुद्ध सातत्याने बोलत राहिले, आवाज उठवत राहिले, आपल्या भूमिका मांडत राहिले म्हणून जर त्यांना कुणी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्याने ज्या नेत्याला ते फार मानतात त्यांनी जर हा सल्ला दिला असेल त्याच्यामध्ये फार पिडा होण्याचं कारण नाही.

जगजीवन राम यांनी 1977 साली काँग्रेस पक्षातून याच मूल्यांसाठी बंड केलं होतं आणि इंदिरा गांधीचा पराभव झाला होता. जर देशात स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकवायची असेल न्यायपालिकेचे स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर सत्तेतल्या काही जणांना त्याग करावा लागतो तो त्याग केला म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं असे संजय राऊत म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img