4 C
New York

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार

Published:

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जेलमधून बाहेर आल्यानंतर मोठी घोषणा केली आहे. दोन दिवसांनी मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे. (Arvind Kejriwal ) जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही. मी प्रत्येक घराघरात जाऊन रस्त्यावर जाईन आणि जोपर्यंत मला जनतेचा निकाल मिळत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही. दरम्यान, दिल्ली विधानसभा भरखास्त होणार नाही असंही केजरीवाल म्हणाले आहेत. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढील वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन नवी खेळी खेळल्याची चर्चा आहे.

Arvind Kejriwal निवडणुक होईपर्यंत दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री असेल :

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुढे म्हटले, “काही लोक म्हणतात की सुप्रीम कोर्टने लावलेल्या निर्बंधांमुळे मी काम करू शकत नाही. त्यांनीही आमच्यावर निर्बंध लादण्यात कोणतीही कसर सोडली नाही. जर तुम्हाला वाटत असेल की मी प्रामाणिक आहे, तर मला मोठ्या संख्येने मतदान करा. निवडून आल्यानंतरच मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसेन. फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार आहेत, पण महाराष्ट्राच्या निवडणुकांबरोबरच नोव्हेंबरमध्ये इथेही निवडणुका घ्याव्यात, अशी माझी मागणी आहे. निवडणुका होईपर्यंत पक्षातील दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री होईल. आमदारांची बैठक येत्या दोन-तीन दिवसांत होणार असून, त्यात पुढील मुख्यमंत्र्यांबाबत निर्णय घेतला जाईल”.

महायुतीतही मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच कायम?

Arvind Kejriwal केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

सीता जेव्हा वनवासातून परतली तेव्हा तिला अग्नीपरीक्षा द्यावी लागली. आज मी अग्नीपरीक्षा देत आहे. फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत विधानसभा निवडणूक आहे. माझी मागणी आहे की, ही निवडणूक नोव्हेंबर महिन्यात घ्यावी. महाराष्ट्रासोबत दिल्लीची विधानसभा निवडणूक होऊ दे. जनतेचा निर्णय येईपर्यंत मी मुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाही. आता जनतेने मला पुन्हा निवडून दिल्यानंतरच मी आणि मनिष सिसोदिया पदांची जबाबदारी स्वीकारु, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img