-5.2 C
New York

Latest News Updates : राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर…

Published:

मुंबई-नाशिक हायवेवर पाच गाड्यांचा विचित्र अपघात, दोघांचा मृत्यू

मुंबई-नाशिक महामार्गावर ट्रक कंटेनेर आणि खासगी बससह पाच वाहनांचा अपघात झाला असून यात दोघांचा मृत्यू झाला आहे.

 कोल्हापुरात शुक्रवारी सीमाप्रश्‍नी धरणे आंदोलन; म. ए. समितीचा निर्णय

कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न गेली २० वर्षे सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. सीमाप्रश्नात  महाराष्ट्र शासनाने लक्ष घालावे आणि  सुनावणीवेळी हजर राहण्यासाठी  वकिलांवर दबाव आणावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण  समितीतर्फे कोल्हापुरात शुक्रवारी (ता. १७) जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे माजी आमदार मनोहर किणेकर आणि प्रकाश मरगाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. १७ जानेवारी हा सीमाभागात हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो, म्हणून या दिवसाची निवड केल्याचे त्यांनी सांगितले.

महाकुंभ मेळ्याच्या तिसऱ्या दिवशी त्रिवेणी संगमावर भाविकांनी केलं पवित्र स्नान

प्रयागराज : ४५ दिवस चालणाऱ्या महाकुंभ मेळ्याच्या तिसऱ्या दिवशी गंगा, यमुना आणि ‘रहस्यमय’ सरस्वती नद्यांचा पवित्र संगम असलेल्या त्रिवेणी संगमावर भाविक पवित्र स्नान करत आहेत.

दक्षिण कोरियातील महाभियोगाच्या निकालानंतर राष्ट्राध्यक्ष यून यांना अटक

दक्षिण कोरियातील महाभियोगाचे निकाल लागू झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष यून यांना अटक करण्यात आली आहे, असे रॉयटर्सने भ्रष्टाचारविरोधी संस्थेच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.

राष्ट्रीय राजधानीसह उत्तर भारतातील काही भागात दाट धुके, दिल्लीला जाणाऱ्या 26 गाड्या धावताहेत उशिराने

भारतीय रेल्वेनुसार, राष्ट्रीय राजधानी आणि उत्तर भारतातील काही भागात दाट धुक्यामुळे दिल्लीला जाणाऱ्या २६ गाड्या उशिराने धावत आहेत.

 पुणे महापालिकेच्या ८० शाळांमध्ये बसविले जाणार सीसीटीव्ही

पुणे महापालिकेच्या ८० शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. महापालिकेच्या सर्व ३०० शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात सुमारे मुलींच्या ८० शाळांमध्ये ३ कोटी ७९ लाख रुपये खर्च करून सीसीटीव्ही लावले जाणार, त्यासाठीच्या खर्चास पूर्वगणनपत्रक समितीने मान्यता दिली आहे. बदलापूर घटनेची गंभीर दखल घेत शासनाने राज्यातील प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही लावण्याचे आदेश दिले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img