जे.पी. नड्डा (JP Nadda) यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेशही झाला होता. मात्र, यानंतर भाजपने (BJP) त्याबाबत घोषणा केलीच नाही, आता मी भाजप प्रवेशाच्या विषयावर फुली मारली, असे वक्तव्य एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse केलं होतं. त्यानंतर खडसेंच्या पक्ष प्रवेशबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) महत्वाचे संकेत दिले. खडसेंच्या प्रवेशबाबबत गणेशोत्सवानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं फडणवीस म्हणाले. दरम्यान, या सर्व घडामोडींनंतर मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मोठं वक्तव्य केलं. एकनाथ खडसे भाजपमध्ये आल्यास आम्ही त्यांचं फटाके फोडून स्वागत करणार, असं वक्तव्य महाजन यांनी केलं. त्यांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
Girish Mahajan खडसे – महाजन यांच्यात टीकेच्या फैरी…
एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी पत्रकार परिषदेत घेऊन मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं होतं. तर खडसे हे शरद पवार गटाचे आमदार आहेत, खडसेंनी आधी आमदारकीची राजीनामा द्यावां, असं म्हटलं होतं. तर खडसे म्हणतात मी भाजपात आलो, पण ते भाजपात आले याबाबत मला माहिती नाही. मलाही समजत नाही खडसे नेमकं कुठं आहेत, असा टोला महाजन यांनी लगावला होता.
Girish Mahajan फटाके फोडून स्वागत करू…
दरम्यान, आज माध्यमांशी महाजन यांनी संवाद साधला. यावेळी त्यांना खडसेंच्या पक्षप्रवेशाविषयी फडणवीसांनी दिलेल्या संकेताबाबत विचारले असता ते म्हणाले, एकनाथ खडसेंच्या प्रवेशाबाबत देवेंद्र फडणवीस काय बोलले हे मला माहित नाही. ते आमचे वरिष्ठ नेते आहेत. ते जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. एकनाथ खडसे भाजपमध्ये येत असतील तर आम्ही फटाके फोडून त्याचं स्वागत करणार, असं महाजन म्हणाले.
मनोज जरांगे यांचा CM शिंदेंना रोखठोक इशारा
Girish Mahajan फडणवीस काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुलीची शपथ घेऊन मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला. यावर फडणवीस म्हणाले की, एकनाथ खडसे काय म्हणाले ते मी ऐकले नाही. त्यांच्यासंदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतला आहे. तो निर्णय आम्हाला मान्यच आहे. त्यासंदर्भात केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून खडसेंच्या प्रवेशबाबत गणेशोत्वसानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं म्हणत त्यांनी खडसेंच्या प्रवेशाबाबत महत्वाचे संकेत दिले.