22.3 C
New York

Income Tax Department : देशातील सर्वात मोठ्या IT कंपनीचे कर्मचारी संकटात

Published:

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services) च्या हजारो कर्मचाऱ्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. TCS कर्मचाऱ्यांकडून 50 हजार ते 1.45 लाख रुपयांपर्यंतच्या कराची मागणीआयकर विभागाने केली आहे.

नोटिसा (Notice) मिळाल्यानंतर हजारो कर्मचाऱ्यांना कंपनीने कामावर राहण्यास सांगितले आहे. सध्या कर मागणीची रक्कम न भरण्याचं आवाहन कंपनीने कर्मचाऱ्यांना केलं आहे. जोपर्यंत आयकर विभागाकडून स्पष्टीकरण मिळत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी कर भरु नये, असे कंपनीने म्हटलं आहे.

Income Tax Department 30 हजार कर्मचाऱ्यांना नोटिसा

आयकर विभागाकडून टीसीएसच्या सुमारे 30 हजार कर्मचाऱ्यांना नोटीस मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी टीसीएसकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. परंतू, कंपनीच्या एचआर विभागाने आयकर विभागाकडून मिळालेल्या नोटीसबाबत सर्व कर्मचाऱ्यांना अंतर्गत ईमेल पाठवल्याची माहिती आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत प्राप्तिकर विभागाने पाठवलेल्या नोटीस केलेल्या TDS कपातीशी संबंधित आहेत.

हे संपूर्ण प्रकरणाचे स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कर भरण्यास मनाई केली आहे. आयकर प्राधिकरणाकडे कराचा मुद्दा आधीच मांडला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना केलेल्या ईमेल मध्ये याबाबतची माहिती दिली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img