26.6 C
New York

Eknath Shinde : अजितदादानंतर शिंदे गटही ॲक्शन मोडमध्ये, 2 दिवसात नावांची घोषणा?

Published:

येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार असल्याने आतापासून सर्व पक्ष कामाला लागले असून उमेदवारांची चाचपणी सुरु करण्यात आली आहे. यातच आज महायुतीमधील (Mahayuti) घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 25 उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश दिले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार शिंदे गटाकडून देखील 25 उमेदवारांची यादी जवळपास फायनल झाली असून लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार असल्याची माहिती शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिली आहे. गुलाबराव पाटील म्हणाले की, आमच्या देखील 25 उमेदवारांची यादी जवळपास फायनल होण्यामध्ये आलेली आहे आणि ती यादी सुद्धा आमचे नेते एकनाथ शिंदे लवकरच जाहीर करणार आहे असं गुलाबराव पाटील म्हणाले. तसेच ही यादी एक-दोन दिवसांमध्ये जाहीर होईल असेही यावेळी ते म्हणाले.

विधानसभेपूर्वी सावध पवित्रा; मराठा आरक्षणावर मोठा निर्णय होण्याची शक्यता

पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने जागांचा तिढा महायुतीमध्ये राहिला होता, तसा विधानसभा निवडणुकीत होणार नाही. याची काळजी महायुतीतील तिन्ही नेते घेत आहेत. यात वाद होऊ नये आणि जो विलंब लागतो, तसं होऊ नये आणि ज्या जो उमेदवार निवडून त्यालाच उमेदवारी देण्यात येईल, असे निश्चित असेल. ज्या ठिकाणी ज्या पक्षाची शक्ती आहे त्या जागा लवकर जाहीर करून, कामाला लावावं असेही यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले.

तर अजित पवार यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, बारामती अजित पवार (Ajit Pawar) यांचे होम ग्राउंड आहे. गेल्या वेळी त्यांचे मताधिक्य जवळपास सव्वा लाख मतांचा होता. लोकसभेत वेगवेगळे खोटे नॅरेटिव्ह पसरवण्यात आले पण लोकसभा आणि विधानसभा, नगरपालिका या निवडणुका वेगवेगळ्या असतात. अजित पवार यांनी बरेच दिवस तिथला प्रतिनिधित्व केला आहे त्यामुळे ते बारामतीमधून लढतील, असा आम्हाला देखील वाटत होतं असं देखील गुलाबराव पाटील म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img