महाविकाससाठी (Mahavikas Aaghadi) मुंबईचं वातावरण अनुकूल असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. महायुतीसाठी लोकसभेसारखेच आव्हान कायम असल्याचे ते म्हणाले. पण सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईत जागा वाटपावरुन काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे.36 विधानसभा जागांवरुन मुंबईतील पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसे उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांच्याकडील जागांचे गणित पाहता आक्रमक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Mahavikas Aaghadi काय आहे पेच
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील 36 विधानसभा जागांपैकी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने 21 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. तर शरद पवार गट 7 जागांसाठी आग्रही आहे. काँग्रेसच्या वाट्याला या सर्व कवायतीत अवघ्या 8 जागा उरत आहेत. काँग्रेसमध्ये नाराजीचा त्यामुळे सूर वाढला आहे. , शरद पवार गट मुंबईतील अंधेरी वेस्ट, वर्सोवा, कुर्ला, अणुशक्ति नगर, दहिसर, घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम या जागांची मागणी करत आहे.
Mahavikas Aaghadi काँग्रेसचा दावा काय?
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 288 पैकी 180 पेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा काँग्रेस नेत बाळासाहेब थोरात यांनी गुरूवारी, 12 सप्टेंबर रोजी केला. महाविकास आघाडीत राज्यातील 125 जागांवर सहमती झाल्याचा दावा त्यांनी केला. तर इतर जागांवर चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट यांनी लोकसभेप्रमाणे विधानसभेत चमत्कार करण्यासाठी चंग बांधला आहे.
मोठी बातमी : केजरीवालांचा तुरूंगवास संपला
Mahavikas Aaghadi मुंबईत महाविकास आघाडी मजबूत
दरम्यान नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मुंबईत महाविकास आघाडी मजबूत स्थितीत आहे, असा दावा केला आहे. मुंबईत महायुतीसाठी आव्हान उभं राहिले असे ते म्हणाले. त्यांनी महाविकास आघाडीतील जागा वाटपासंबंधी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. पण महाविकास आघाडीत 125 जागांवर सहमती झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तर कोणतीही जागा महायुतीसाठी अजिंक्य नाही असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तर विजयासाठी महाविकास आघाडी मेहनत घेणार असल्याचे सांगितले.