11.6 C
New York

Haryana Election : विधानसभेसाठी काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, राहुल गांधींसह ‘या’ नेत्यांचा समावेश

Published:

सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी (Haryana Election) काँग्रेसकडून (Congress) स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा आणि माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा यांचा समावेश करण्यात आला आहे. हरियाणा विधानसभेसाठी 05 ऑक्टोबर रोजी 90 जागांसाठी मतदान होणार आहे तर 08 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या या यादीत पक्षाचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला आणि कुमारी सेलजा यांच्या देखील समावेश करण्यात आला आहे. याच बरोबर विनेश फोगट (Vinesh Phogat) आणि बजरंग पुनिया यांचीही नावे पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आले आहे. तर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, हरियाणाचे प्रभारी दीपक बाबरिया, राज्य युनिट प्रमुख उदय भान, अजय माकन, बीरेंद्र सिंग, आनंद शर्मा आणि सचिन पायलट यांचा देखील स्टार प्रचारकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच अशोक गेहलोत, भूपेश बघेल, चरणजीत सिंह चन्नी आणि इतर अनेक नेत्यांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

मोठी बातमी: मुंबईचे डबेवाले आणि चर्मकारांना सरकारचं मोठ्ठं गिफ्ट

तर दुसरीकडे जुलाना येथून यावेळी विनेश फोगट यांना कॉग्रेसने तिकीट दिले आहे तर भाजपकडून योगेश बैरागी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर जुलानामधून आम आदमी पार्टीने WWE महिला कुस्तीपटू कविता दलाल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये जागावाटपावर चर्चा होत होती मात्र त्यांच्यात आघाडी न झाल्याने आम आदमी पक्षाने सर्व 90 जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img