आताच्या डिजिटल पद्धतीत रोजच नवनवीन फिचर्स येत आहेत. यामुळे ऑनलाइन व्यवहार अधिक सोपे आणि सुरक्षित झाले आहेत. आताही युपीआय लाइट युजर्ससाठी आनंदाची बातमी आली आहे. जर तुम्ही देखील पैसे देवाणघेवाणीसाठी UPI Lite फिचरचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाचीच आहे. 31 ऑक्टोबरपासून तुम्ही तुमच्या UPI Lite अकाउंटमध्ये तुमच्या मनाला वाटेल तितकी रक्कम रिलोड करण्यासाठी ऑटो टॉपअप पर्यायाचा वापर करू शकाल.
एपीसीआयने यासंदर्भात नुकतेच एक परिपत्रक जारी करत घोषणा केली आहे. UPI Lite टॉपअप सुविधा याच वर्षात 31 ऑक्टोबरपासून लागू केली जाणार असल्याची माहिती या परिपत्रकात देण्यात आली आहे. UPI Lite बॅलन्स स्वयंचलित पद्धतीने संबंधित युजरने निश्चित केलेल्या रकमेमे रिलोड होईल. या मागचा मोठा उद्देश पाचशे रुपयांपेक्षा कमी रकमेचे व्यवहार पिनरहीत देवाणघेवाणीची सुविधा सोपी करणे हा आहे. युजरच्या युपीआय वॉलेटमध्ये दोन हजार रुपयांपर्यंतची रक्कम लोड करणे आणि युपीआय पिनचा वापर न करताच पाचशे रुपयांपर्यंतचे व्यवहार करण्याची सुविधा प्रदान करणे हा एक महत्वाचा उद्देश यामागे आहे.
नऊ वर्षांत पहिल्यांदाच एसटी बस सुसाट, ऑगस्टमध्ये 16 कोटींपेक्षा अधिक नफा
UPI lite ‘या’ गोष्टी पक्क्या लक्षात ठेवाच
पण यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी आणखी एक महत्वाची गोष्ट आहे. ती युजरने लक्षात ठेवली पाहिजे. UPI Lite बॅलन्स सुविधा दोन हजार रुपयांपर्यंत आहे. यापेक्षा जास्त रक्कम रिलोड करण्याची सुविधा सध्या नाही. त्यामुळे युजर्सना दोन हजारांपेक्षा जास्तीची रक्कम रिलोड करता येणार नाही. इतकेच नाही तर तुम्हाला एखादे वेळी वाटले की ही सुविधा आपल्याला नको आहे अशा वेळी ऑटो टॉप अप सुविधा रद्द करता येईल अशी माहिती या परिपत्रकात देण्यात आली आहे.
UPI Lite फिचर नेमकं काय
UPI Lite हे एक खास फिचर आहे. युजर या फिचरच्या मदतीने पैसे देवाणघेवाणीचे व्यवहार करताना पिन नंबरची गरज राहणार नाही. ही सुविधा फक्त पाचशे रुपयांपर्यंतच्याच व्यवहारासाठी आहे. अशा प्रकारचे व्यवहार संबंधित बँकेच्या कोअर बँकिंग सिस्टीमचा उपयोग न करताच होतात