22.3 C
New York

Ambernath MIDC : मोठी बातमी! अंबरनाथमधील एमआयडीसीत वायूगळती; सर्वत्र पसरला धूर

Published:

ठाण्याजवळच्या अंबरनाथ शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Ambernath MIDC) शहरातील मोरिवली एमआयडीसी परिसरात रासायनिक वायूगळती झाली आहे. या प्रकाराने शहरात सर्वत्र धुराचे साम्राज्य दिसून येत आहे. नागरिकांतही घबराट पसरली आहे. एमआयडीसीतील एका कंपनीतून गुरुवारी रात्री रासायनिक वायूगळती झाली. आता हा गॅस चुकून लीक झाला की कंपनीतूनच सोडण्यात आला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेने शहरात मात्र घबराट पसरली आहे. नागरिक धास्तावले आहेत. शहरात दूरवर धुराची चादर दिसून आली. या धुरामुळे अनेकांना त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात धूर कसा पसरला याची माहिती स्थानिक प्रशासनाने अद्याप दिलेली नाही.

Ambernath MIDC नेमकं काय घडलं?

गुरुवारी रात्री साधारण दहाच्या सुमारास मोरिवली एमआयडीसीच्या परिसरात उग्र वास येऊ लागला. त्यामुळे अनेक नागरिकांना त्रास जाणवू लागला. अंबरनाथ पूर्व भागातील बी केबिन रोडवर वायू मोठ्याप्रमाणावर पसरला होता. त्यामुळे नागरिकांना अग्निशामन दलाला घटनास्थळी पाचारण केले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी तपास आणि चौकशी केली असता एमआयडीसीतील कोणत्याही कंपनीतून गॅस सोडण्यात आला नाही, असे सांगण्यात आले. मात्र, अंबरनाथ परिसरात प्रचंड धूर पसरला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती.

Ambernath MIDC वायूगळतीमुळे अंबरनाथच्या रहिवाशांना त्रास

अंबरनाथ MIDC परिसरातील मोरीवली येथील निकाकेम केमिकल कंपनीतून केमिकल हवेत पसरल्याने नागरिकांच्या घशात खवखव आणि डोळ्यात जळजळ होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत अंबरनाथ शहरात केमिकल पसरले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img