22.3 C
New York

Tanaji Sawant : मंत्री तानाजी सावंतांच्या पुतण्याच्या घराबाहेर गोळीबार; घटनेने परिसरात तणाव

Published:

राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते डॉ. तानाजी सावंत यांचे (Tanaji Sawant) पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्री दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या (Mahrashtra News) पार्श्वभुमीवर ही घटना घडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे.

गुरुवारी रात्री साडेबारा वाजल्यानंतर धनंजय सावंत यांच्या सोनारी परिसरातील बंगल्यासमोर दोन अज्ञात व्यक्तींनी बंदुकीतून तीन फायर केले. यावेळी धनंजय सावंत घरातच होते. सुरक्षारक्षकही बाहेर होते. मात्र गोळीबार करणाऱ्या व्यक्तींची ओळख पटलेली नाही. या घटनेने परिसरात मात्र खळबळ उडाली आहे. गोळीबार करणारे कोण होते? गोळीबार करण्यामागचं कारण काय? अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

खूशखबर! लवकरच सुरू होणार UPI lite ऑटो टॉपअप; जाणून घ्या

गोळीबार केल्यानंतर गोळीबार करणारे लागलीच फरार झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बंगल्याबाहेर असलेले सुरक्षारक्षकही सुखरुप आहेत. गोळीबाराचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. धनंजय सावंत आणि त्यांच्या सुरक्षारक्षकांनाही गोळीबार कुणी केला याची माहिती नव्हती. या घटनेनंतर त्यांनी लागलीच पोलीस स्टेशन गाठले. येथे रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

गोळीबार कुणी केला याची माहिती अजून उजेडात आली नसली तरी यामागे काही राजकीय कारण आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी खंडेश्वरी प्रकल्प पुजनाप्रसंगी ठाकरे गट, शरद पवार गट आणि सावंत गट यांच्यात किरकोळ वाद झाले होते. या वादाचीच किनार या गोळीबाराला आहे अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img