राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सध्या लोकप्रिय घोषणा आणि निर्णयांचा धडाका लावला आहे. यामध्ये शुक्रवारी आणखी एका निर्णयाची भर पडली. त्यानुसार आता मुंबईच्या डबेवाल्यांसाठी (Mumbai Dabbawala) महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत म्हाडाकडून (Mhada house) मुंबईत डबेवाल्यांसाठी घरे बांधली जाणार आहेत. चर्मकार समाजालाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेतंर्गत मुंबईचे डबेवाले आणि चर्मकार समाजाला मुंबईत 500 चौरस फुटांचे घर अवघ्या 25 लाख रुपयांमध्ये मिळणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी सभागृहात याबाबतची घोषणा केली होती. देवेंद्र फडणवीस यांची डबेवाल्यांच्या संघटनेने शुक्रवारी या पार्श्वभूमीवर सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. मुंबईतच घर देण्यासंदर्भात यावेळी झालेल्या बैठकीत मुंबईतील डबेवाल्यांना सामंजस्य करार करण्यात आला. डबेवाल्यांना गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत घर मिळावे, पाठपुरावा यासाठी सुरु होता. या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. सह्याद्री अतिथीगृहावरील आजच्या बैठकीला नमन बिल्डरचे जयेश शाह, प्रियांका होम्स रियालिटीचे रुद्रप्रताप त्रिपाठी, आ. श्रीकांत भारतीय, डबेवाला संघटनेचे उल्हास मुके, चर्मकार निवारा असोसिएशनचे अशोक गायकवाड महाराज यावेळी उपस्थित होते.
पाकिस्तानला मिळालं काळ्या सोन्याचं घबाड पण, समोर आलं ‘हे’ संकट.. वाचा
Mumbai Dabbawala डबेवाल्यांच्या घरांसाठीचा प्रकल्प कसा असणार?
मुंबईचे डबेवाले आणि चर्मकार समाजासाठी एकूण 12 हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी प्रियांका होम्स रिॲलिटीकडून 30 एकर जागा देण्यात आली आहे. नमन बिल्डर्सकडून या प्रकल्पातील घरांचे बांधकाम केले जाणार आहे. नमन बिल्डर्सकडून ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर हे काम केले जाणार आहे. त्यामुळे डबेवाल्यांना 500 चौरस फुट क्षेत्रफळाचे घर अवघ्या 25 लाखांमध्ये उपलब्ध होणार आहे. या घरांचे बांधकाम येत्या तीन वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.