-0.4 C
New York

Mumbai Fire : मुलुंड येथील निवासी इमारतीला आग, महिलेचा होरपळून मृत्यू

Published:

मुलुंड परिसरात Mulund Apartment Fire News असलेल्या ओपल अपार्टमेंटच्या 9व्या मजल्यावर भीषण आग (Mumbai Fire) लागली. या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.माहिती देताना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अग्निशमन विभागाने सांगितले की, आगीची घटना आज (13 सप्टेंबर) दुपारी 12.24 वाजता घडली. मुलुंडमधील एलबीएस रोडवरील भांडुप सोनापूर सिग्नल येथे असलेल्या ओपल अपार्टमेंटमध्ये ही आग लागल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai Fire वृद्ध महिलेचा मृत्यू

16 मजली अपार्टमेंट इमारतीच्या 9व्या मजल्यावर आग लागली, ज्यामध्ये एक एस.एम. आनंदी (68) या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, घटनेनंतर त्यांना जवळच्या एम.टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली.

Mumbai Fire आगीचे कारण अस्पष्ट

सध्या आगीचे कारण समोर आले नसून अग्निशमन दलाचे ऑपरेशन सुरू आहे. याशिवाय घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलासह वरिष्ठ पोलीस अधिकारी हजर आहेत. तसेच अपघाताचा तपास सुरू आहे. या आगीच्या दुर्घटनेतील सुदैवाची बाब म्हणजे आग जास्त पसरली नाही आणि वेळीच ती आटोक्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वृद्ध महिलेला या अपघातात वाचवता आले नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img