22.9 C
New York

PresVu Eye Drop : नंबरचा चष्मा घालवण्याचा दावा करणाऱ्या ‘आयड्रॉप’चा विक्री परवाना निलंबित; कारण काय?

Published:

दृष्टीदोष दूर करणारे आणि चष्म्यापासून कायमची मुक्ती देणारं औषध मुंबईस्थित (PresVu Eye Drop) औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीने विकसित केल्याचा दावा केला होता. परंतु हे औषध बाजारात येण्याआधीच त्यावर बंदी घालण्यात आली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या औषधाला मंजुरीही दिली होती. प्रेस्वू आयड्रॉप असे या औषधाचे नाव आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (CDSCO) मायोपिया व हायपरमेट्रोपिया दूर करण्याचा दावा करणाऱ्या या औषधाच्या विक्रीचा परवाना निलंबित केला आहे.

मुंबईतील कंपनीने दावा केला होता की मायोपिया आणि हायपमेट्रोपिया या व्याधींच्या इलाजासाठी प्रेसवू नावाने एक औषध विकसित करण्यात आले आहे. या औषधाच्या नियमित वापराने नंबरचा चष्मा जाऊ शकतो असे कंपनीने म्हटले होते. सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशनच्या तज्ज्ञ कमिटीने आधी या उत्पादनाची शिफारस केल्यानंतर ENTOD फार्मास्यूटिकल्सला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून अंतिम मंजुरी मिळाली होती. मात्र सीडीएससीओनेच या औषधाच्या विक्रीचा परवाना निलंबित केला आहे.

कुठे बरसणार, कुठे ब्रेक घेणार? ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने प्रचार केला म्हणून या आयड्रॉपच्या विक्रीचा परवाना निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ज्या लोकांना चष्मा आहे त्या लोकांचे लक्ष या औषधाच्या जाहिरातीने वेधले होते. परंतु, औषधाचा सुरक्षित वापर आणि लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करून पुढील नोटीस येईपर्यंत औषधाच्या विक्रीचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. कारण हे औषध फक्त प्रस्क्रिप्शनवरच खरेदी करता येऊ शकत होतं.

फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या औषधाचा वापर करता येऊ शकत होता. परंतु, नंबरचा चष्मा घालवता येऊ शकेल अशा पद्धतीने या औषधाचा प्रचार केला गेला. औषध निर्मिती करणाऱ्या निर्मात्यांच्या म्हणण्यांनुसार अनोखे फॉर्म्युलेशन आणि निर्माण प्रक्रियेसाठी पेटंटसाठी अर्ज करण्यात आला आहे. या औषधाच्या वापराने चष्मा वापरण्याची गरज कमी होते तसेच डोळ्यांसाठी लूब्रिकेशनचे कामही हे औषध करते असा दावा निर्मात्यांनी केला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img