मागील वर्षी मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे आमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले, (Sakal Maratha Samaj) त्यानिमिताने महाराष्ट्र राज्य सरकारकडून दरवर्षीप्रमाणे मराठवाडय़ातील अनुशेष व विकासाचा आढावा घेऊन त्रृटी दुर करण्यासाठीच मंत्रिमंडळाची बैठक घेतली जाते, तशी 16 सप्टेंबर 2023ला छत्रपती संभाजीनगरमध्ये कॅबिनेट बैठक झाली, मोठ्या थाटामाटात मराठवाडय़ातील जनतेला खुष करण्यासाठी 45000,कोटी रुपयांचे पॅकेज व उर्वरित निधी म्हणून 14000रु कोटीची वेगळी घोषणा यावेळी करण्यात आली.
परंतु आज पुर्ण वर्ष झाले तरी त्यातील ऐक छदामही मराठवाडय़ातील जनतेच्या तोंडावर फेकून मारला नाही, समन्यायी पाणी वाटप प्रश्न गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे. समांतर जलवाहिणीच्या अपूर्ण निधी व राजकीय महत्वाकांक्षे पायी, संभाजीनगरमधील जनेतला आठ आठ दिवस पाणी मिळत नाही. गेल्या सत्तर वर्षात 2 लाख 32000 हजार कोटी रुपयांवर अनुशेष गेला आहे.
मराठवाडय़ातील शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार तरुण रोज आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. तेव्हा या प्रश्नासाठी (दि 13 सप्टेंबर सकाळी 11 वा.क्रांतीचौकात ) मराठवाडय़ातील सर्व जनतेच्यावतीने तीव्र धरणे आंदोलन करणार आहोत, मराठवाडय़ातील सर्व पक्षीय, सर्व संघटना, सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित रहावे असे अवाहन सकल मराठा समाज व मराठवाडय़ातील सर्व जनतेच्यावतीने करण्यात येत आहे.
प्रा.चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, सुनिल कोटकर, सतीश वेताळ, रमेश गायकवाड, आशोक मोरे, आत्माराम शिंदे, निलेश ढवळे,सचिन मिसाळ, सुकन्या भोसले, रेखाताई वहटुळे, दिव्या पाटील, मनोज गायके, रवि निळ, व सर्व जातीय सर्व धर्मीय, सर्व पक्षीय जनता.