8.9 C
New York

Supriya Sule : बारामतीतून कोणाला संधी? पुढील 8 दिवसांत क्लिअर होणार, सुळेंनी सांगितलं…

Published:

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) चांगलीच चर्चा सुरु आहे. विधानसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु असून जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहेत. अशातच बारामती मतदारसंघातून युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्या नावाची चर्चा सुरु झालीयं. या पार्श्वभूमीवर माध्यमांकडून सुप्रिया सुळेंना सवाल करण्यात आला. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, बारामती मतदारसंघाची जागा कोणत्या पक्षाला हेच अद्याप निश्चित झालेलं नाही, राष्ट्रवादीला मिळाल्यास पक्ष उमेदवार ठरवणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी क्लिअर सांगितलंय. बारामतीत सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधलायं.

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामतीची जागा कोणता पक्ष लढणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. गणेशोत्सवानंतर महाविकास आघाडीत विस्तृत चर्चा होईल. कोणता पक्ष किती जागा लढवणार याबाबतची चर्चा झाली आहे, पण कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार असेल? याबाबत अद्याप ठरलेलं नाही पुढील 8 दिवसांत हे फायनल होणार असून राष्ट्रवादीला जागा आली तर उमेदवारांबाबत पक्ष ठरवणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय.

‘जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षण..’ राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यांवर अमित शाह संतप्त

सध्या बारामती मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार हे विद्यमान आमदार आहेत. अजित पवार सध्या महायुतीत असल्याने महायुतीकडून अजित पवार हेच मैदानात उतरणार असल्याचं चित्र आहे, मात्र जिथं पिकतं तिथं विकत नाही, असं विधान करीत बारामती मतदारसंघातून अजित पवार निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत खुद्द अजितदादांनी दिले होेते. त्यानंतर महाविकास आघाडीकडून युगेंद्र पवार मैदानात उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे आता बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्याविरोधात नेमका कोण उमेदवार असणार? याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय.

Supriya Sule  न्यायालयात आम्हाला न्याय मिळेलंच…

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे चिन्ह आणि पक्ष आज त्यांच्याकडे नाही. शेवटी विजय सत्याचा होतो, सत्यमेव जयते,सर्वोच्च न्यायालयात आम्हाला नक्की न्याय मिळणार असल्याचा विश्वास सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केलायं. दरम्यान, बारामतीमध्ये घडलेला बॅनरचा विषय अतिशय दुर्देवी असून महाराष्ट्र राज्यात आजपर्यंत सुसंस्कृतपणा जपला आहे. बारामतीची जागा कोण लढवणार आहे, हे अद्याप फायनल झालेलं नसून गणेशोत्सवानंतर पुढील आठ दिवसांत समजणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img