राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये आज भूकंपाचे (Earthquake) धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदु पाकिस्तानात होता. पाकिस्तानचे राजधानीचे शह आणि लाहोरमध्ये भूकंप झाला. 5.8 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा हा भूकंप होता. उत्तर प्रदेश, राजस्था, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले. अफगाणिस्तानही या भूकंपाने हादरला. मागील दोन आठवड्यांत दिल्लीत हा दुसरा भूकंप आहे.
पृथ्वीच्या आत सात टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट न थांबता फिरत असतात. या प्लेट ज्यावेळी एकमेकांना धडकतात. रगडल्या जातात. त्यावेळी जमिनीला धक्के बसतात. यालाच भूकंप म्हणतात. भूकंपाचे मोजमाप करण्यासाठी रिक्टर या परिमाणाचा वापर केला जातो. याला रिक्टर मॅग्नीट्यूड असेही म्हणतात.
‘जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षण..’ राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यांवर अमित शाह संतप्त
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी 12:58 वाजता (IST) दिल्ली-एनसीआरमध्ये 5.8 रिश्टर स्केल तीव्रतच्या भूकंपाचे धक्के जाणवले. तसेच शेजारील देश इस्लामाबाद आणि लाहोरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू पाकिस्तानमधील करोरच्या नैऋत्येस 25 किमी अंतरावर असून त्याची खोली 10 किमी होती अशी माहिती समोर आली आहे.
Earthquake भूकंप का होतो?
पृथ्वीच्या आत सात टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स सतत फिरत राहतात. जेव्हा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात किंवा एकमेकांवर चढतात किंवा एकमेकांपासून दूर जातात तेव्हा जमीन थरथरू लागते. याला भूकंप म्हणतात. भूकंप मोजण्यासाठी रिश्टर स्केलचा वापर केला जातो. याची तीव्रता जास्त असल्यास जास्त नुकसान होते.