26 C
New York

Mumbai Train Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कल्याणकडून कसाऱ्याकडे जाणारी रेल्वेसेवा ठप्प

Published:

‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी काहीशी स्थिती मध्य रेल्वेची झाली आहे. (Mumbai Train Update) कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ, कर्जत, ठाणे या ठिकाणी राहणाऱ्या प्रवाशांना दररोज मध्य रेल्वेचा त्रास सहन करावा लागत आहे. याचा फटका मध्य रेल्वेवर देखील पडला होता. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले होते. मध्य रेल्वेची वाहतूक अशातच आजही विस्कळीत झाली आहे. गीतांजली एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे. टिटवाळा स्टेशनदरम्यान एक्स्प्रेस रखडली आहे. यामुळे अनेक लोकल गाड्याही अडकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी टिटवाळा स्थानकाजवळ गीतांजली एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. गीतांजली एक्स्प्रेस रखडल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. इंजिनमधील बिघाड दुरूस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र यामुळे कल्याणकडून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक बंद आहे. तसेच प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. इंजिन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. बिघाड दुरुस्त झाल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत होईल, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

महायुती आणि मविआमध्ये कोण ठरणार वरचढ?

Mumbai Train Update मध्य रेल्वे कायमच उशिरा

दरम्यान मध्य रेल्वे ही उशिराने धावत असल्याची तक्रार सातत्याने प्रवाशांकडून केली जात आहे. मध्य रेल्वेच्या लोकलचे वेळापत्रक कायमच कोलमडले असल्याचे पाहायला मिळते. कर्जत, कसाराहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या धिम्या व जलद मार्गावरील लोकल सेवा पूर्ण विस्कळीत झाली.लोकल सेवा विस्कळीत झाल्याने दिवा, कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली, टिटवाळा रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी उसळली. अनेक लोकल या अनियमित वेळेत धावत होत्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img