28.9 C
New York

Gautami Patil : गौतमी पाटीलच ‘लिंबू फिरवलंय’ गाणं प्रदर्शित….

Published:

Gautami Patil : अमेय वाघसोबत पाठमोऱ्या उभ्या असणाऱ्या तरुणीचा एक फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यांनंतरपासून ही अभिनेत्री कोण अशी चर्चा सर्वत्र रंगली होती. आता या गोष्टीवरून पडदा उठला असून, ही अभिनेत्री आता दुसरी तिसरी कोणी नसून महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील आहे. ‘लाईक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटातील नुकतेच तिचे आणि अमेय वाघचे पहिले धमाकेदार गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘लिंबू फिरवलंय’ या भन्नाट गाण्याला क्षितिज पटवर्धन यांचे बोल आणि अमितराज यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे.

तर वैशाली सामंत आणि रवींद्र खोमणे यांनी आपल्या ठसकेबाज आवाजात हे गाणे गायले आहे. राहुल ठोंबरे यांनी पॅनारॉमा म्युझिक लेबल असणाऱ्या या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. हे गाणे ऐकायला जितके जल्लोषमय आणि प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे आहे, तितकेच पाहायला ही कमाल आहे. गौतमी पाटील पहिल्यांदाच लिंबू फिरवलंय’ या गाण्याच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर तिचा जलवा दाखवणार आहे.नखरेल अदाकारांनी घायाळ करणारी गौतमी पाटील संपूर्ण महाराष्ट्रावर या गाण्यातून लिंबू फिरवणार आहे, असे म्हणायला हरकत नाही.

दीपवीरच्या लेकीसाठी नेटकऱ्यांनी सुचवलं नाव….

दिग्दर्शक अभिषेक मेरुकर या गाण्याला असे म्हणतात की, “एक धमाल गाणे असायलाच हवे, असा अट्टहास असल्यामुळे, ‘लाईक आणि सबस्क्राईब’ मधून एक दमदार गाणे आम्ही घेऊन आलो आहोत. अतिशय कमाल तुफान वाजणारे हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. नृत्य दिग्दर्शन, संगीत टीम,या सगळ्याच गोष्टी उत्तम जुळून आल्या आहेत. त्यात या गाण्यात गौतमी पाटीलचा ठसकेबाज परफॉर्मन्स अधिकच रंगत आणतो. प्रत्येक समारंभात हे गाणं नक्की वाजेल, याची खात्री वाटते.”नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून लेखन आणि दिग्दर्शनही अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. ‘लाईक आणि सबस्क्राईब’मध्ये जुई भागवत, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे, अमेय वाघ, अमृता खानविलकर, यांच्या मुख्य भूमिका असून, येत्या १८ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img