6.2 C
New York

Amit Shah : निवडणुकीनंतर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा; गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान

Published:

जम्मू काश्मीर राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका (Jammu Kashmir Elections) जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीची मोर्चेबांधणी राजकीय पक्षांकडून केली जात आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर (Article 370) राज्यात पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत. याच पार्श्वभुमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रध्वज आणि राज्यघटनेनुसार निवडणूक होत आहे. या विधानसभा निवडणुकीनंतर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल केला जाईल असे आश्वासन अमित शाह यांनी पलौरा येथील सभेत दिले.

जम्मू काश्मीर विधानसभेच्या एकूण 90 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. जम्मू काश्मिरात तीन टप्प्यांत मतदान पार पडणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबरला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 25 सप्टेंबर तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबरला होणार आहे. तर 4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. कलम 370 रद्द झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्वाची आहे. भाजपकडून यासाठी ताकद झोकून देण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल येथे होते. यावेळी त्यांनी एका सभेत जम्मू काश्मीरबाबत मोठी घोषणा केली. तसेच नॅशनल कॉन्फरन्स आणि अन्य विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. शाह म्हणाले, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स राज्यात पुन्हा जुनी व्यवस्था आणू पाहत आहेत. एनडीए सरकार सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन काम करत आहे. कुणावरही अन्यायाची परवानगी सरकारकडून दिली जाणार नाही.

काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष राज्यातील जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहे. स्वायत्ततेच्या घोषणांनी मागील तीन दशके काश्मीर अशांत होतं. यात चाळीस हजार लोकांचा मृत्यू झाला. आता हे लोक पुन्हा त्याच हिंसेच्या आगीत राज्याला टाकण्याची इच्छा बाळगून आहेत. राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर अमित शाह म्हणाले मला कळत नाही की राहुल गांधी काश्मीरला राज्याचा दर्जा कसा देऊ शकतील कारण हे काम फक्त केंद्र सरकारच करू शकते.

जम्मू काश्मीरच्या निवडणुका ऐतिहासिक आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक अशी आहे ज्यामध्ये राज्यातील जनता देशाच्या तिरंगा या एकाच ध्वजांतर्गत मतदान करील. ही निवडणूक भाजप दृढ निश्चयाने लढत आहे त्यामुळे आपल्या विजयाबद्दल कुणीही शंका बाळगू नका. या निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट देखील वाचणार नाही असा दावा शाह यांनी केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img