राज्यात शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीकडे (Maharashtra Election 2024) संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. केंद्रीय निवडणूक आयोग येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा देखील करणार आहे. त्यामुळे आतापासूनच महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) जागावाटपावरून बैठका सुरु झाले आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर विधानसभेसाठी महायुतीमधील कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी (Sanjay Gaikwad) आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे गट 120 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तसेच 120 पैकी 100 जागांवर आमचा विजय होणार असा दावा देखील त्यांनी केला आहे.
निवडणुकीनंतर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा; गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पेक्षा जास्त स्ट्राईकरेट शिंदे गटाचा असल्याने तसेच लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदेंची असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिंदे गट 120 जागा लढवणार असा दावा आता शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. माहितीनुसार, शिंदे गट जगावाटपाच्या बैठकीत आक्रमक भूमिका घेणार आहे.
तर दुसरीकडे अजित पवार गट देखील कमीत कमी 60 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. काही दिवसापूर्वी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी 80 ते 90 जागांवर निवडणूक लढवण्याचा दावा केला होता त्यामुळे भाजप (BJP) आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. भाजपला महायुतीमध्ये असलेल्या शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या मागण्या मान्य असेल का? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.
महायुतीमध्ये मुख्यमंत्री पद आपल्याकडे राहावं यादृष्टीनं शिंदे गट जागावाटपाच्या बैठकीत आक्रमक भूमिका घेणार असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे भाजप आता काय? भूमिका घेणार हे पाहावे लागेल.