3 C
New York

MPSC Exam : राज्यसेवा पूर्व अन् संयुक्त पूर्व परीक्षेला मुहूर्त लागेना’

Published:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा व संयुक्त पूर्व परीक्षा यंदाच्या वर्षातील आठ महिने संपूनही घेतलेली नाही. आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तारखा चार वेळा जाहीर केल्या, पण प्रत्येक वेळी परीक्षा पुढे ढकलावी लागली. (MPSC Exam ) त्यात कृषी विभागाच्या जागा समाविष्ठ झालेल्या नाहीत. दुसरीकडे शासनाकडून अजूनही सर्व मागणीपत्रे न आल्याने संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात देखील प्रसिद्ध झालेली नाही. सहा ते साडेसहा लाख विद्यार्थी या दोन्ही परीक्षेची तयारी करीत असून त्यातील अनेकांची वयोमर्यादा संपुष्टात येत असल्याची वस्तुस्थिती आहे.

MPSC Exam आयोगाने सातत्याने पाठपुरावा

मागील वर्षी संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात फेब्रुवारीत प्रसिद्ध झाली आणि एप्रिलमध्ये परीक्षा पार पडली होती. तत्पूर्वी, राज्य सेवेची पूर्व परीक्षा देखील आयोगाने घेतली होती. मात्र, यावर्षी सप्टेंबर उजाडला तरी राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाला घेता आलेली नाही. विद्यार्थ्यांचे आंदोलन, राज्य सरकारचे आदेश व मराठा आरक्षण, या कारणांमुळे परीक्षा चारवेळा पुढे ढकलावी लागली. तर संयुक्त पूर्व परीक्षेसाठी शासनाने सर्व विभागांकडील रिक्त पदांची मागणीपत्रे द्यावीत म्हणून आयोगाने सातत्याने पाठपुरावा केला, पत्रव्यवहारही केला. मात्र, अद्याप सर्व विभागांकडून मागणीपत्रे आयोगाला मिळाली नसल्याने संयुक्त पूर्व परीक्षा देखील मागील आठ महिन्यांत झालेली नाही.

शिंदेंना हव्यात 120 जागा, भाजप काय निर्णय घेणार?

MPSC Exam दोन ते अडीच लाख विद्यार्थी

या सगळ्या गोंधळात तरूणांचे नुकसान होत असून त्यांना आर्थिक भुर्दंड देखील सोसावा लागत आहे. अनेकांची वयोमर्यादा संपुष्टात येत असल्याने त्यांची ही शेवटची संधी असेल अशीही स्थिती आहे. निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान याची आठवण आता ना आयोगाला ना सरकारला, अशीच सद्य:स्थिती आहे. तसंच, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी दोन ते अडीच लाख विद्यार्थी बसले आहेत.

MPSC Exam दिवाळीनंतर होण्याची शक्यता

नियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा २८ एप्रिल रोजी होणार होती. पण, मराठा आरक्षणानंतर विद्यार्थ्यांना ‘ईडब्ल्यूएस’ऐवजी ‘एसईबीसी’ किंवा कुणबीचा पर्याय देण्यासाठी परीक्षा पुढे ढकलावी लागली. त्यानंतर ६ जुलै, २१ जुलै आणि आता २५ ऑगस्ट यावेळी होणारी नियोजित परीक्षादेखील पुढे ढकलावी लागली. आयोगाने २५ ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलताना लवकरच तारीख कळवू असे पत्रातून स्पष्ट केले होते. मात्र, १० दिवस होऊनही आयोगाने नवीन तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे परीक्षा निवडणुकीमुळे दिवाळीनंतर होईल, असे बोलले जात आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img