राज्यात गणेशोत्सवास सुरुवात झाली आहे. (Crime News) या काळात पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक काटेकोर केली आहे. या गणेशोत्सवात पुण्यातील अंमली पदार्थ विक्रेत्यांवर नजर ठेवली जात आहे. याच दरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पथकाने जवळपास चाळीस लाखांचे मेफेड्रोन जप्त केले आहे. एक पिस्तुलही जप्त केले आहे. पुणे शहरातील कोंढवा भागात ही कारवाई करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
कोंढवा परिसरातील भाग्योदयनगर भागात एका एका युवकाकडे मेफेड्रोन असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने या युवकाच्या घरी छापा टाकला. त्यावेळी पथकाला त्याच्याकडून चाळीस लाख रुपये किंमतीचे 202 ग्रॅम मेफेड्रोन, एक पिस्तूल आणि मोबाइल असा 42 लाख रुपयांचा माल मिळून आला.
लाडक्या बहिण’ योजनेबाबत महिला व बालविकास खात्याचा मोठा निर्णय
पुण्याचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, संदीप शिर्के, प्रवीण उत्तेकर, संदेश काकडे, दयानंद तेलंगे पाटील, विपुल गायकवाड, योगेश मोहिते आदींच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.