3.8 C
New York

Sanjay Raut : ‘पवारांच्या डोक्यात काय हे फडणवीसांना शंभर वर्षही कळणार नाही’; राऊतांचा खोचक टोला

Published:

विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्रिपदाचा (Elections 2024) चेहरा कोण यावर महाविकास आघाडीत घमासान सुरू आहे. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा आम्ही पाठिंबा देऊ असे उद्धव ठाकरे काही (Uddhav Thackeray) दिवसांपूर्वी म्हणाले होते. त्यांची ही मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नाकारली. निवडणुकीनंतर संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेऊ असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. यातच देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या (Devendra Fadnavis) एका वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) प्रत्युत्तर दिले. शरद पवार यांच्या डोक्यात काय आहे हे फडणवीसांना शंभर वर्षही कळणार नाही, असे राऊत म्हणाले.

राऊत पुढे म्हणाले, फडणवीसांच्या डोक्यामध्ये आधी मेंदू आहे का? हे त्यांना कुणी सांगितलं. पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात. पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे जर फडणवीसांना आधी कळलं असतं तर त्यांची आज अशी अवस्था झाली नसती. आज त्यांच्या आयुष्याची, राजकारणाची आणि प्रतिष्ठेची जी घसरण झालेली आहे तशी झाली नसती. शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर वर्ष सुद्धा कळणार नाही. 2019 साली शरद पवारांच्या डोक्यात काय होतं हे त्यांना कळलं नाही पण झाले ना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री. आता हिंमत असेल तर वेळेत निवडणुका घ्या, मग कोणाच्या डोक्यात काय आहे आणि डोक्यातून काय बाहेर येतंय हे जेव्हा समजेल तेव्हा फडणवीस यांचा मेंदू काम करायचं बंद होईल असा टोला राऊतांनी लगावला.

मराठवाड्यात राजकीय भूकंप! धनंजय मुंडेंनी भल्या पहाटे घेतली जरांगेंची भेट

Sanjay Raut आगामी निवडणूक एकत्रच लढणार

महाविकास आघाडीचे तीन पक्ष प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर इतर घटक पक्ष आहेत. प्रत्येकाने एकत्र येऊन आपापल्या जागांसंदर्भात चर्चा करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वाचा पक्ष आहे. प्रत्येक जण आपापल्या उमेदवारांची तयारी करा अशा प्रकारच्या सूचना नक्कीच देतात. शेवटी निवडणुका आम्ही एकत्रितच लढणार आहोत असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

Sanjay Raut अमित शाह लालबागचा राजा गुजरातला नेणार का?

अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. गृहमंत्री असल्याने त्यांना मुंबईत येण्याची परवानगीची गरज नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. अमित शहा यांना आमचा विरोध यासाठीच आहे की महाराष्ट्रात त्यांनी ज्या पद्धतीने दळभद्रीच राजकारण करुन महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला. मुंबई महाराष्ट्रातून ज्या पद्धतीने व्यापार, उद्योग, रोजगार अनेक महत्त्वाचे आर्थिक केंद्र गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अमित शहा यांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत. आज ते गृहमंत्री आहेत पण कमजोर गृहमंत्री आहेत.

या महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. जम्मू-काश्मीर,मणिपूर आणि इतर भागातील कायदा सुव्यवस्थेकडे यांचं अजिबात लक्ष राहिलेलं नाही. राजकारण, पक्षफोडी, लुटमार याला पाठिंबा देणं, मुंबई लुटणं, लुटणाऱ्यांना पाठिंबा देणं, शिवसेना ,राष्ट्रवादी ,काँग्रेस पक्षासारखं महाराष्ट्रातले स्वाभिमानी पक्ष फोडून महाराष्ट्र अतिकमजोर करणं अशा प्रकारची काम त्यांनी केली. हे गृहमंत्र्यांचं काम नाही. महाराष्ट्र विकलांग करायचा दुर्बल करायचा हे त्यांचं स्वप्न आहे. आणि त्यासाठीच ते महाराष्ट्रात येत असतात. महाराष्ट्राची जनता त्यांना या राज्याचा शत्रू मानते. लालबागच्या राजाच्या दर्शनाला ते येत आहेत, येऊ द्या. पण मला सारखी भीती वाटते की ज्याप्रमाणे मुंबईतले अनेक उद्योग, अनेक संस्था त्यांनी गुजरातला पळवल्या त्याप्रमाणे ते एक दिवस लालबागचा राजा गुजरातला नेणार नाहीत ना.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img