-9.9 C
New York

Ganeshotsav : सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळाचे १२७ वे वर्ष

Published:

संदीप साळवे,पालघर

स्वातंत्र्यपूर्वकाळात सुरू झालेल्या जव्हार येथील श्रीराम मंदिर सार्वजनिक श्रीगणेशोत्सव (Ganeshotsav) मंडळाचे यंदा शतकोत्तर २७ वे वर्ष आहे .महाराष्ट्रातील प्रमुख गणेशोत्सवातील शंभर वर्षे पूर्ण करणारे हे गणेश मंडळ आहे. मानाचा गणपती म्हणून ख्याती आहे . उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे लोकमान्य टिळकांनी १८९३ साली कसबा पेठेतील गणपतीची स्थापना करून गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. त्यांनंतर ४ वर्षांनी म्हणजेच १८९८ साली जव्हार संस्थांचे नरेश यशवंतराव मुकणे महाराज यांनी जव्हार मध्ये हा उत्सव थाटामाटात सुरू केला. त्यावेळेसच्या ग्रुप आणि उत्साह आज देखील या उत्सवात कायम आहे.यंदा मंडळाचे अध्यक्ष सूरज वाघ यांच्या नेतृत्वात उत्सव अधिक भव्य दिव्य होणार असल्याचे बोलले जात आहे.
नव्वदच्या दशकापासून उत्सवाला थोडीशी उतरती कळा लागली होती, म्हणजे महिलांनी उत्सव ताब्यात घेतला होता. नंतर, काही वर्ष हा उत्सव माघी गणेश उत्सव स्वरूपात साजरा करण्यात आला होता. त्याची स्थापना गांधी चौक येथे होत होती, पण तद्नंतर दिवंगत दिनेश भट यांच्यासारखं तरुण नेतृत्व उत्सवाला लाभलं, आणि बघता बघता उत्सवाचं खूप मोठ्या स्वरूपात रूपांतर झाले, त्यावेळी त्यांच्या समवेत संदीप वैद्य, प्रशांत ओक, नवनीत जोशी, हर्षद मेघपुरीया,भरत बेंद्रे, अरविंद तंत्रि, राजु अंभिरे, अविनाश काळे अजून बरेच युवा तरुण होते .लालबागच्या राजाचा जसा बोलबाला आहे नवसाला पावतो तसाच येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ,जव्हार या ठिकाणी असलेल्या मयूरेश्वराचा देखील बोलबाला असल्याचे सांगण्यात येते.

लाडक्या बहिण’ योजनेबाबत महिला व बालविकास खात्याचा मोठा निर्णय


सन १९९८ साली या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची शंभरी पूर्ण झाली, शंभर वर्षाचे कार्यक्रम साजरे करत असताना त्यामध्ये जव्हार अनिवासी जव्हारकर यांचा संमेलन भरवण्यात आलं होतं तसेच ढोल ताशांच पथक पहिल्यांदा जव्हार मध्ये आणलं होतं.या उत्सवात अबाल वृद्ध व महिला अशांसाठी भरगच्च असे कार्यक्रम दहा दिवसात राबविण्यात येतात. वस्तू ओळखणे ,स्मरणशक्ती ,चमचा लिंबू ,बुद्धी वाढणारे खेळ तर महिलांसाठी सुगरण कौशल्य, होम मिनिस्टर ,बाई पण भारी देवासारखे महिलांसाठी कार्यक्रम तसेच पालघर जिल्हात व जव्हार परिसरात असामान्य अशी कामगिरी केलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सोहळा कर्तृत्ववाचा झेंडा रोविला असा साजरा करतो. अशा नानाविध स्पर्धांनी भरलेला असा हा उत्सव त्यामध्ये मुलांच्या अंतर्गुणांना म्हणजेच नाच, नृत्य, गायन अभिनयाला देखील वाव मिळतो अशा या उत्सवाला आजपर्यंत दिवंगत धर्मवीर आनंद दिघे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अशा महान व्यक्तींनी देखील भेट दिली आहे.


दरम्यान, उत्सवात आरोग्यासाठी साठी मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित केली जातात. आजपर्यंत या उत्सवाला अनेक जिल्हा व तालुका स्तरीय पारितोषिक मिळालेली आहेत यंदा उत्सवाचे १२७ वे वर्षे साजरे होत असून या वर्षीचे अध्यक्ष सुरज वाघ आणि त्यांची कार्यकारणी ही देखील तितक्याच उत्साहाने जोमात काम करत आहे. येथील गणेशोत्सव हा लोकमान्य टिळकांना प्रेरित आणि अपेक्षित असा उत्सव असतो.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img