26.6 C
New York

Narendra Modi : पाण्याचा वापर जपून करावा, पंतप्रधान मोदींचे आवाहन

Published:

देशात केवळ चार टक्के गोड्या पाण्याचे स्रोत आहेत, (water) त्यामुळे देशवासीयांनी पाण्याचा वापर जपून करायला हवा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलं आहे. ते गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. पाण्याचा वापर कमी करा, पाण्याचा पुनर्वापर करा आणि पाण्याचे पुनर्भरण तसंच पुनर्चक्रिकरण करा हे सूत्र सर्वांनी आत्मसात करायला हवं, असं आवाहनही मोदी यांनी केलं. सुरत येथे आयोजित करण्यात आलेल्या जलसंचय जन भागीदारी या कार्यक्रमात मोदी यांनी व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थितांना संबोधित केले.

जलसंवर्धन आणि पर्यावरणाचे संरक्षण हे भारतीयांच्या संस्कृतीचाच एक भाग असून, आपण पाण्याला देवता मानतो तर नदीची देवी म्हणून पूजा करतो, असं प्रतिपादनही मोदी यांनी यावेली केलं आहे. देशातील सुमारे ८० पाणीसाठ्याचा उपयोग हा शेतीसाठी करण्यात येतो त्यामुळे ठिबक सिंचनासारख्या तंत्राचा वापर करणं आवश्‍यक असून त्याचा अधिकाधिक प्रसार झाला पाहिजे, असं मत पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केलं.

मणिपूर हादरलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर रॉकेट हल्ला

जलसंधारणाच्या चळवळीत केवळ सरकारची धोरणंच नव्हे तर सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून होणारा लोकसहभागही महत्त्वाची भूमिका बजावतो मागील कित्येक दशकांपासून जलसंधारण आणि नद्यांच्या संरक्षणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष परिणाम हे मागील दहा वर्षांच्या काळातच दिसले असा दावाही त्यांनी यावेळी केला. देशातील ७५ टक्के घरांत आता नळाद्वारे शुद्ध पाणी येते. घराघरांत शुद्ध पाणी पोहोचविल्याने देशातील सर्व नागरिकांचे मिळून एकूण साडेपाच लाख तास वाचतात. जल जीवन मिशनमुळे घराघरांत शुद्ध पाणी पोहोचल्याने दूषित पाण्याने होणाऱ्या आजारांपासून प्रतिवर्षी चार लाख जणांचा जीव वाचविण्यात सरकारला यश आलं असंही ते म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img