28.9 C
New York

Thane : आदिवासींच्या हातांना गणेशोत्सवात रोजगार…

Published:

Thane : गणपती बाप्पांच आगमन प्रत्येकाच्या घरोघरी झाले त्याच्यामुळे गणेशोत्सवात भक्तांकडून यंदा मोठ्या प्रमाणात पर्यावरण पूरक सजावटीकडे नागरिकांचा कल असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत वृक्षांच्या फांद्या ,रानावनातील फुले विक्रीसाठी दाखल झाले आहेत. तसंच नागरिकांकडून देखील रान ,पान फुलांना मोठी मागणी वाढल्याने या आदिवासींचे उद्योगाला चांगली झळाळी मिळाली आहे.

सध्या कल्याण डोंबिवली बाजारपेठामध्ये पर्यावरण पूरक साहित्याची उलाढाल मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कर्जत, खोपोली अंबरनाथ पासून सजावटीसाठी विविध रंगाची फुलं आणि वृक्षांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात भक्तांकडून खरेदी केला जात आहे. त्याच्यामुळे मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसून येत आहे.

बऱ्याच लोकांना सद्बुद्धीची गरज पण, नावं घेणार नाही’; फडणवीसांच्या निशाण्यावर कोण?

तेरड्याची रोप व फुलं ,हळदीची फुले ,बेल, केळीचे खांब अशा सर्व साहित्यांची खरेदी सध्या नागरिकांकडून जोरात केली जात आहे. रानावनातून आदिवासी मोठ्या प्रमाणात या साहित्याची विक्री करण्यासाठी शहरांमध्ये दाखल झालेत. डोंबिवली कल्याण यांसह दिवास्थानकातही आदिवासींच्या साहित्य विक्रीचे उद्योग मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहेत. नागरिकांना कमी किमतीत जास्त साहित्य मिळत असल्याने फुले पाने खरेदी कडे भक्तांचा कल दिसून येत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img