महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात आज श्री गणेशाचं आज आगमन होत आहे. (Maharashtra Rain) मागील दोन दिवसांपासून राज्यभरातील मोठ्या शहरांत बाजारपेठा फुलल्या आहेत. (Ganeshotsav) यामध्ये गणरायाच्या मुर्तीपासून सजावटीचं विविध प्रकारचं साहित्य पाहायला मिळतय. शहरांतील अनेक चौकात मोठे-मोठे व्यासपीठ उभारले असून तेथे आज गणरायाची स्थापना होणार आहे. दरम्यान यंदा गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी असून गणेशोत्सव दहा नव्हे तर अकरा दिवसांचा असणार आहे.
Maharashtra Rain घाट परिसरात पाऊस
देशभरात गणरायाच्या आगमणाचं उत्सवाचं वातावरण असलं तरी पावसाचं सावट मात्र कायम आहे. देशातील अनेक राज्यांत पावसाचा कडेलोट झालेला आहे. गणेशाचे स्वागत अनेक ठिकाणी पावसांच्या सरीने होणार आहे. भारतीय हवामान विभागाने आज काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रामुख्याने घाट परिसरात जोरदार पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे.
Maharashtra Rain मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला
पुणे आणि साताऱ्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावासाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पाहायला मिळतील. ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदु्र्गमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. नाशिक, कोल्हापूरमध्ये देखील चांगल्या पावसाचा अंदाज आहे. तसंच, पूर्व विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला आहे. १२ सप्टेंबरपर्यंत राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची स्थिती आहे.
यंदाचा गणेशोत्सव अकरा दिवसांचा; गणरायाचं जल्लोषात होतंय स्वागत..
Maharashtra Rain मुंबईची काय स्थिती
मुंबईमध्ये आज तापमान २६ ते ३१ अंश सेल्सियस इतके असेल. याशिवाय आज ढगाळ हवामान राहील. मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आज गणेश भक्तांना पावसामध्ये भिजूनच गणरायाचे स्वागत करावे लागणार आहे. उद्या देखील मध्यम पावसाचा अंदाज आहे. तसंच, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये साधारण ते मध्यम प्रकारचा पाऊस पाहायला मिळले. ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे.