Nashik Flower News : भाज्यांसह फूल बाजारातील फुलांची आवक पावसाच्या रिपरिपीने काही प्रमाणात घटली आहे.श्रावण व आता त्यानंतर गणेशोत्सवामुळे मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या फुलांच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. महिलांना प्रिय असलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्याला हरतालिकेच्या पार्श्वभूमीवर मोठी मागणी असल्याने पाचशे रुपये किलो असलेल्या किलोभर मोगऱ्यासाठी आज महिलांना हजार रुपये मोजावे लागले.
नाशिक येथील गोदाघाटावर सकाळी दररोज फुलबाजार भरत असतो. सर्वच प्रकारची फुले या बाजारात उपलब्ध असल्याने ग्राहकांचाही मोठा प्रतिसाद आहे. या फुलांना श्रावणापूर्वी विशेष मागणी नव्हती,त्यामुळे आवकही कमीच होती.श्रावणापासून मागणी वाढल्याने आता आवकेतही मोठी वाढ झाली आहे.शेतकरी, फूल व्यावसायिक हजर होतात. यात पिवळ्या व लाल झेंडूसह गुलाब, शेवंती, अस्टर, गुलछडी, गेडा, लिली आदी फुलांची भल्या पहाटेपासून आवक होते.
हरियाणाचा राजकीय आखाडा खेळाडूंसाठी किती सेफ?
चारशे ते पाचशे रुपये झेंडूच्या एका कॅरेटसाठी मोजावे लागत होते. तीनशे रुपयांपर्यंत हाच दर कालपर्यंत सीमित होता. गुलाबाच्या दरातही आता दुपटीने वाढ झाली आहे. आज हरतालिकेच्या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये विशेष प्रिय असलेल्या मोगरा गजऱ्याला मोठी मागणी होती. किलोभर मोगऱ्यांसाठी कालपरवापर्यंत चारशे ते पाचशे रुपये असलेल्या मोगऱ्यांसाठी चक्क हजार ते बाराशे रुपये मोजावे लागत होते.त्यामुळं ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर महिलांना थोडा महागाईचा सामना करावा लागणार आहे.