3 C
New York

Eknath Shinde : गणेशोत्सवाच्या मुख्यमंत्र्यांकडून जनतेला शुभेच्छा

Published:

आज महाराष्ट्रासह देशभरात गणरायाचं आगमन होणार आहे. याचा मोठा उत्साह सगळीकडे पाहायला मिळत आहे. गणरायाचं आगमन सर्वांना आनंदाचे, समृद्धी, समाधानाचे पर्व घेऊन येवो अशी प्रार्थना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. राज्यातील जनतेलामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ( Ganeshotsav ) तसंच, हा उत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

Eknath Shinde शेतकऱ्यांसाठी आनंदाचं पर्व

राज्याच्या विकास चक्राला गती देण्यासाठी गणरायाचे आगमन राबणाऱ्या प्रत्येकासाठी, शेतकरी, कष्टकरी, कामगार बांधवासाठी राज्यातील माता-भगिनींसाठी, आबाल-ज्येष्ठांसाठी आनंदाचे, आरोग्यदायी, समृद्धीचे, समाधानाचे पर्व घेऊन येवो अशी प्रार्थना केली. गणेश आगमनाच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नागरिकांसह, जगभरातील तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. श्री गणेशांचे अखंड कृपाछत्र महाराष्ट्रावर राहावे, अशी मनोकामनाही मुख्यमंत्र्यांनी बाप्पा चरणी केली आहे.

गणपती बाप्पाचं विसर्जन करताना काळजी घ्या, मुंबई महापालिकेने दिल्या सूचना…

Eknath Shinde सामाजिक बांधिलकीची जाणीव

दरवर्षी श्री गणेशाचे आगमन एक नवी ऊर्जा, प्रेरणा आणि उत्साह घेऊन येते. यातून मंगलमय, पवित्र वातावरण निर्माण होते. गणेशोत्सवातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडते. म्हणून जगाचंही महाराष्ट्राकडं लक्ष लागलेले असते. श्री गणेशाला कलाधिपती मानले जाते. त्यामुळे या उत्सव काळात कलाविष्कारालाही उधाण येतं. महाराष्ट्राचा काना कोपरा अशा अविष्कारांनी, उत्साह-जोश यांनी ओसंडून जातो. यंदाही आपण हा उत्सव उत्साहात, जल्लोषात आणि पावित्र्य राखून साजरा करूया. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवूया. असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत.

Eknath Shinde महाराष्ट्राचा मानबिंदू

श्री गणेश आपल्याला निसर्ग पूजनाचा संदेश देतात. आपणही पर्यावरणाची काळजी घेऊया. निसर्ग संवर्धनाच्या उपक्रमांना पाठबळ देऊया. निसर्गाचं जतन-संवर्धन होईल, अशा प्रयत्नांत सहभागी होऊया. सामाजिक सलोखा हा महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. त्यामुळे श्री गणेशाकडून सकारात्मक ऊर्जा, प्रेरणा घेऊन राज्यातील सामाजिक सलोखा-बंधुभाव परस्परांतील प्रेम-आदर भाव वाढीस लागेल, असे प्रयत्न करुया असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img