Ganesh Chaturthi : गणरायाच्या आगमनाची प्रत्येकाला वर्षभर आतुरता असते. गणेशोत्सव हा भारतातील सर्वात लोकप्रिय असा एक सण आहे. तसंच गणेश चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणून देखील ओळखले जाते. सुखकर्ता ,विघ्नहर्ता 14 विद्या व 64 कलांचा अधिपती असे गणपती बाप्पाला संबोधले जाते. हिंदू धर्मामध्ये आपल्याला जर कोणत्याही कार्याची सुरुवात ही करायची असेल तर आपण गणपती बाप्पाच्या पूजनानंतरच आपण करतो. गणपती बाप्पा भक्तांची सर्व विघ्न दूर करतो त्यामुळे गणपती बाप्पाला विघ्नहर्ता देखील संबोधले जाते. सहसा ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान भाद्रपद या हिंदू महिन्यात गणेश चतुर्थी येते.
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी आपण साजरी करतो. तसंच सात सप्टेंबर पासून तिथीच्या मान्यतेनुसार गणेश चतुर्थी यंदा साजरी केली जाणार आहे. यावेळी गणेशमूर्तींची घरोघरी प्राणप्रतिष्ठापना करून पूजाअर्चा केली जाते. तसंच आजच्या दिवसांपासून 21 दिवसापर्यंत गणेशोत्सव हा सुरू असणार आहे. यंदा सात सप्टेंबर रोजी पंचांगानुसार गणेश चतुर्थीच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा २ तास 31 मिनिटे असा असणार आहे. सकाळी ११वाजून ०३ मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून 34 मिनिटापर्यंत आपण गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करीत पूजा करू शकता.
गणेश चतुर्थीचे महत्त्व
माता पार्वती आणि महादेव शंकर यांचा मुलगा गणेश जेव्हा जन्माला आले तो दिवस म्हणजेच भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी
म्हणूनच या दिवसाला विनायक चतुर्थी किंवा गणेश चतुर्थी असे संबोधले जाते. गणपती बाप्पाच्या पूजेमुळेच घरामध्ये समृद्धी सुख आणि भरभराट होते असे देखील मानले जाते. तसंच आपल्या कोणत्याही शुभकार्यामध्ये विघ्न येऊ नये म्हणून गणपती बाप्पाची आराधना करतात.
हिंमत असेल तर…; भुजबळांचं जरांगेंना आव्हान
गणेश चतुर्थी कशी साजरी केली जाते?
गणपती बाप्पाच्या स्थापनेच्या आदल्या उसापासून घरामध्ये सुंदर सजावट केली जाते. तसंच गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. तसंच गणपती बाप्पाच्या उपासना करण्याच्या तब्बल 16 पद्धती आहेत. यामध्ये गणरायाला पिवळ्या व लाल फुलांनी सजवले जाते तसेच मूर्तीला लाल चंदन देखील लावले जाते. गणपती गणपती बाप्पाला दुर्वा आणि जास्वंदीचे फुल अत्यंत प्रिय आहे, पूजेच्या वेळेस त्या गणपती बाप्पाला अर्पण केल्या जातात. तसंच गूळ नारळ व 21 मोदकांचा नैवेद्य गणपती बापाला दाखवला जातो. गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ मोदक असा मानला जातो. तसंच ढोल ताशांच्या गजरामध्ये उत्सवाच्या शेवटच्या दिवशी भक्तिमय वातावरणात मूर्तींच्या मिरवणुका नद्यांकडे नेल्या जातात. असच मूर्तींचे विसर्जन विधीचा एक भाग म्हणून केले जाते. आणि आपले आई वडील म्हणजेच शिव आणि पार्वतीचा घर असलेल्या कैलास पर्वतावर गणपती बाप्पा परत जातात, असे मानले जाते