Ganesh Chaturthi : हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. प्रामुख्याने या दिवशी देशभरात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरी केला जातो. सार्वजनिक मंडळांमध्ये घरोघरी गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. जवळपास दहा दिवस राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो.
गणपतीची प्रत्येक ठिकाणी पूजा आराधना केली जाते. तसंच या दिवसांमध्ये सगळीकडे चैतन्याचा आणि उत्साहाचं वातावरण असतं. या काळामध्ये बाप्पाला प्रिया असणारे अनेक गोष्टी अर्पण केल्या जातात. पण यामध्ये दुर्वांचे देखील महत्त्व सांगण्यात आले आहे.
महाविकास आघाडीचं सरकार येऊ दे; खडसेंचं बाप्पाला साकडं
गणपती बाप्पाला दूर्वा का आवडतात?
पौराणिक कथेनुसार, मायावी अन्लासुर नावाच्या राक्षसाने ऋषीमुनी आणि देवता यांना त्रास द्यायला सुरुवात केली होती. अनल अर्थात अग्नी. त्यानंतर गणपतीला शरण गेले आणि देवतांच्या विनंती नंतर त्या असुराला गणेशजींनी गिळून टाकले. यामुळे गणपती बाप्पाच्या पोटामध्ये जळजळ होऊ लागले तेव्हा 88 सहस्त्र मुलींनी 21 अशा हिरव्यागार दुर्वांच्या जोड्या गणपती बाप्पांच्या मस्तकावर ठेवल्या आणि दुर्वांच्या 21 जोड्या कश्यप ऋषींनी गणेशाला खाण्यास दिल्या.
त्यानंतर गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ अथक प्रयत्नानंतर कमी झाली. तेव्हा मला जो कोणी दुर्वा अर्पण करेल त्याला हजारो यज्ञ, तीर्थयात्रा आणि दान केल्याचे पुण्य मिळेल, असे गणेश जी तेव्हा म्हणाले होते. म्हणून गणपती बाप्पाला पौराणिक कथेनुसार दुर्वा वाहिल्या जातात.