21 C
New York

Ajit Pawar : ‘मुख्यमंत्री कोण होणार हे ठरलंय,’ अजितदादांनी आता स्पष्टच सांगितलं

Published:

राज्यात विधानसभेच्या निवडणुका जवळ (Maharashtra Elections 2024) आल्या आहेत. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महविकास आघाडीने (MVA) जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मतदारसंघ आणि उमेदवारांची चाचपणी होत आहे. जागावाटपाचा निर्णय झाला नसला तरी चर्चेला मात्र तोंड फुटलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर धुसफूस वाढू लागली आहे. महायुतीच्या तुलनेच महाविकास आघाडीत या मुद्द्यावर जास्त ओढाताण दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी यावर भाष्य करत चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे अजित पवार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत काय परिस्थिती आहे यावर भाष्य केलं.

अजित पवार यांनी नुकतीच इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना राज्याच्या नेतृत्वाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री निश्चितच महायुतीचा होईल. महायुतीचं लक्ष निवडणुकीत विजय मिळवण्यावर राहणार आहे. मुख्यमंत्री नक्कीच महायुतीचा होईल. परंतु, चेहरा ठरवणे ही सध्याची प्राथमिकता नाही. त्यामुळे महायुती एक धोरणात्मक अवस्थेत आहे. निवडणुकीत यश मिळेपर्यंत नेतृत्वावर चर्चा थांबवल्या आहेत.

महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत नंबर 1 वर; फडणवीसांकडून आकडेवारी जाहीर

जागावाटपाच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, निवडून येण्याच्या क्षमतेवर जागावाटप होईल. आम्ही तिघे एकत्रित बसून कोणत्या मतदारसंघात कुणाची किती ताकद आहे याचा विचार करून याबाबत निर्णय घेऊ. 2019 च्या निवडणुकीत आम्ही 56 जागा जिंकलो होतो. सहा ते सात अपक्ष आमदारही आमच्याबरोबर होते. त्यामुळे यंदा आम्ही 60 जागा लढण्यास इच्छुक आहोत. यापेक्षाही जास्त जागा मिळाव्या आणि त्याही मेरिटवर मिळाव्यात यासाठी आमचा प्रयत्न नक्कीच राहिल.

Ajit Pawar काँग्रेस अन् शरद पवार गटाला प्रश्न का नाही

विचारधारेत अंतर असतानाही भाजप आणि शिवसेनेशी जुळवून (Shivsena) कसं घेतलं असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, युती करताना आम्ही धर्मनिरपेक्ष विचारांशी तडजोड करणार नाही असे स्पष्ट केले होते. हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसने सरकार (Congress Party) स्थापन केले होतेच. मी देखील त्या सरकारमध्ये होतो. मग हा प्रश्न त्यांना का विचारला जात नाही? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.

शरद पवार यांच्याविरोधात (Sharad Pawar) बोलणार नाही असे तुम्ही म्हणाला होतात याची आठवण करून दिल्यानंतर अजित पवार म्हणाले, फक्त शरद पवारच नाही तर मी कुणाच्याही विरोधात बोलायचं नाही असं ठरवलं आहे. मी फक्त माझं काम करत राहणार असून त्यातूनच उत्तरं देत राहणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img