राज्य पोलीस दलातील 25 पोलीस अधिकार्यांच्या गुरुवारी (5 सप्टेंबर) गृह विभागाकडून बदल्या (Police transfer) करण्यात आल्या. त्यात 17 पोलीस उपायुक्त-पोलीस अधिक्षकांसह आठ सहाय्यक पोलीस आयुक्तांचा समावेश आहे. मुंबईच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची पुण्याला, तर राजतिलक रोशन यांची कायदा व सुव्यवस्थेच्या सहाय्यक पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा गृह विभागचे सह सचिव व्यकंटेश भट आणि अवर सचिव संदीप ढाकणे यांनी संबंधित पोलीस अधिकार्यांच्या बदल्याचे आदेश जारी केले. (Transfers of 25 Officers in Maharashtra State Police Force)
या बदल्यामध्ये पुण्याचे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांची पुणे ग्रामीण, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची मुंबई, मुंबईच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची पुणे, राजतिलक रोशन यांची कायदा व सुव्यवस्थेच्या सहाय्यक पोलीस महानिरीक्षक, नागपूरचे पोलीस उपायुक्त निमित गोयल यांची मुंबई, विजय चव्हाण सोलापूरचे समादेशक यांची सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य, रोहिदास पवार छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त यांची पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक, प्राचार्य लक्ष्मीकांत पाटील नागपूरचे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे यांची महाराष्ट्र राज्याच्या सायबर सेल, लोहित मतानी भंडार्याचे पोलीस अधीक्षक यांची नागपूर येथे बदली करण्यात आली आहे.
मोठी बातमी ! मुंबईतील टाईम्स टॉवरला भीषण आग
ठाण्याचे पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांची मुंबईत, सुशांत सिंह यांची अमरावती समादेशक, देशमुख अभयसिंह बाळासाहेब यांची पुणे पोलीस अधीक्षक, गोकुळ राज बी यांची नवी मुंबई राज्य राखीव बलाच्या समादेशक, कांबळे आशित नामदेव यांची नंदुरबार येथील अप्पर पोलीस अधीक्षक, महक स्वामी व निथीपुडी रश्मिता राव यांची नागपूर, सोलापूर राज्य राखीव बलाच्या समादेशक पंकज अतुलकर यांची, सिंगा रेड्डी हृषिकेश रेड्डी यांची गडचिरोली अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
अन्य पोलीस अधिकार्यांमध्ये दीपक अग्रवाल यांची नागपूर ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, दुगड दर्शन प्रकाशचंद्र यांची नंदुरबारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, हर्षवर्धन बी. जे. यांची यवतमाळच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, जीवन देवाशिष बेनीवाल यांची परभणी उपविभागीय पोलीस अधिकारी, नवदीप अग्रवाल यांची वाशिमच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, शुभमकुमार यांची अमरावती उपविभागीय पोलीस अधिकारी, विमला एम यांची सांगली उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वृष्टी जैन यांची नागपूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.