-6.9 C
New York

Ganeshostav Pune : लाडक्या ‘गणराया’च्या आगमनासाठी पुणेकर सज्ज

Published:

राज्यभरात गणरायाच्या आगमनासाठी जय्यत तयार सुरु आहे. पुण्यातही गणशोत्सवासाठी (Ganeshostav Pune) जोरदार तयारी सुरु आहे. लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी सार्वजनिक गणेश मंडळांकडून भव्य मंडप उभारण्यात आले आहेत. गणेशोत्सव काळात वाहतुकीस अडथळा होऊ नये, यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आलायं. तर एकूण 7 हजार पोलिसांचा फौजफाटा पुण्यात तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिलीयं.

पुण्यात एकूण 3798 सार्वजनिक गणेश मंडळं असून गणेशोत्सव काळात पोलिस बंदोबस्तासाठी एकूण 7 हजार पोलिस कर्मचारी तैनात असणार आहे. यामध्ये 4 अतिरिक्त पोलिस आयुक्त, 10 पोलिस उपायुक्त, 23 सहाय्यक आयुक्त, 128 पोलिस निरीक्षक, 568 सहाय्यक पोलिस निरीक्षक, 4604 अंमलदार, 1100 होमगार्ड, तर एसआरपीएफच्या 10 तुकड्या तैनात असणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त कुमार यांनी दिलीयं.

निवडणुकीआधीच विनेश अन् बजरंगची काँग्रेसमध्ये एन्ट्री

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एकूण 1742 लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलीयं. या काळात पेट्रोल, डिझेलसारख्या ज्वालाग्रही पदार्थांचा देखाव्यासाठी उपयोग करण्यास मनाई करण्यात आलीयं. तसेच साऊंडच्या आवाजावर मर्यादा ठेवण्यात आलीयं, नियमांचं पालन न झाल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी पोलिस आयुक्त कुमार यांनी दिलायं. गणेशोत्सव काळात 12 सप्टेंबरपासून 17 सप्टेंबरपर्यंत सकाळी 6 वाजता ते रात्री 12 वाजेपर्यंत साऊंड स्पीकरला परवानगी देण्यात आली असून या काळात फटाके वाजवण्यास मनाई करण्यात आलीयं.

गणेशोत्सवाच्या काळात शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून अनेक रस्ते अवजड वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहेत. बंद करण्यात आलेल्या रस्त्यांऐवजी पर्यायी रस्त्यावरुन वाहतुकीचा पर्याय देण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात शिवाजी रोड, गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौकापर्यंतची वाहतूक बंद करण्यात आलीयं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img