26.6 C
New York

Ganesh Chaturthi : गणेशोत्सवासाठी ओतूर पोलीस सज्ज

Published:

ओतूर,प्रतिनिधी: दि.६ सप्टेबर ( रमेश तांबे )

गणेश मंडळांनी वहातुकीस अडथळा होणार नाही अशा पद्धतीने मंडप उभारावेत, मिरवणुकीत (Ganesh Chaturthi) पारंपारिक वाद्यांचा वापर करावा तसेच ध्वनी प्रदूषणा संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून, या वर्षीचा गणेशोत्सव शांततेत साजरा करावा, असे आवाहन ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी ओतूर ( ता.जुन्नर ) येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ओतूर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांची बैठक ओतूर क्रीडा संकुल येथे बोलविण्यात आली होती. याप्रसंगी श्री थाटे हे बोलत होते.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक अनिल केरूरकर,ओतूरचे उपसरपंच प्रशांत डुंबरे,पोलीस हवालदार महेश पठारे,पोलीस कर्मचारी रोहित बोंबले, ज्योतीराम पवार, नामदेव बांबळे,आनंदा भवारी तसेच ओतूर पोलीस स्टेशन हद्दीतील विविध गावातील गणेश मंडळांचे अध्यक्ष,पदाधिकारी तसेच विविध गावचे पोलिस पाटिल व गणेश मंडळाचे कार्यकर्ते,ओतूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थीत होते.

श्री थाटे पुढे म्हणाले की,गणेशोत्सव साजरा करताना, गणेश मंडळांनी वर्गणीची सक्ती करू नये,स्वइच्छेने देणगी घ्यावी.तसेच डीजे डॉल्बी चा आवाज मर्यादा ५० डेसिबल इतकी ठेवली असून आवाजाचे उलंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत,गणेश मूर्तीची सुरक्षितता जबाबदारीने करावी,आक्षेपार्ह देखावे सादर करू नयेत,आक्षेपार्ह घोषणा देऊ नयेत, दोन धर्मात तेढ निर्माण होईल असे वर्तन करू नये,अश्लील नृत्य करू नये,जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये,सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज व्हायरल करू नये तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून,समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करावे, उत्सवा दरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img