मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue ) कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला (Jayadeep Apte) पोलिसांनी अटक केली. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांपासून जयदीप फरार होता. अखेर जयदीपला त्याच्या कल्याणमधील घरातून पोलिसांनी अटक केली. जयदीपच्या शोधासाठी सात पथकांकडून शोध मोहिम सुरू होती, अखेर पोलिसांनी त्याला गुरूवारी अटक केली. या मुद्द्यावर आता राजकारण सुरू झालं आहे. आपटेला वाचविण्यासाठी जी कायदेकज्ज्ञांची फौज आहे ती भाजपशी निगडीत आहे. ह्यांच्या रक्तातच बेईमानी आहे, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) केला होता.
त्यांच्या या आरोपांवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना संजय राऊतांच्या भाजपवरील (BJP) वक्तव्याबाबत विचारलं. संजय राऊत यांना अशा गोष्टी बोलण्याची सवयच आहे. मला वाटतं जयदीप आपटेला बहुधा संजय राऊतांनीच लपवून ठेवलेलं होतं असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला.
अजितदादांना आमचे सर्व गुण लागतील; फडणवीसांनी हसून सांगितलं
Devendra Fadnavis जयदीप आपटे असा अडकला जाळ्यात
जयदीप आपटे या घटनेनंतर फरार झाला होता. पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात होता. लूक आऊट नोटीसही त्याच्या विरोधात जारी करण्यात आली होती. राज्य सरकारला विरोधकांकडून मात्र धारेवर धरले जात होते. जयदीपला लपवून ठेवल्याचे राज्य सरकारनेच सांगितले जात होते. पोलिसांकडून त्यामुळे शोध मोहिमेला गती दिली होती. या घटनेनंतर जयदीप आपटेचे कुटुंबीय शहापूरला नातेवाईकांकडे गेले होते. जयदीपची पत्नी आणि आईची पोलिसांनी तिथे जाऊन चौकशी केली होती. पुन्हा कल्याणला त्यानंतर जयदीपचे कुटुंबीय आले होते.
पुन्हा कल्याणला दरम्यान, जयदीपच्या पत्नीने दिलेल्या आपटेला अटक केल्याचे सांगितले जात आहे. आत्मसमर्पण करण्यासाठी आपटेचे कुटुंबीय आणि नातेवाईक त्याला समजावत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपटेने पत्नीशी संपर्क करून घरी परत येणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पत्नीने ही माहिती पोलिसांना दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पोलिसांना जयदीपला अटक करता आली.