3.8 C
New York

Congress Party : निवडणुकीआधीच विनेश अन् बजरंगची काँग्रेसमध्ये एन्ट्री

Published:

हरियाणा विधानसभेच्या (Haryana Elections) निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस पक्ष (Congress Party) कमालीचा अॅक्टिव्ह झाला आहे. यंदा राज्यात काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे. राज्यातील वाढत्या अँटी इन्कम्बसीचा फटका भाजपला बसू शकतो असा काँग्रेस नेत्यांचा कयास आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडे इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे उमेदवारांची नावं निश्चित करताना वरिष्ठांची दमछाक होत आहे. यातच कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट या दोघांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर दोघेही लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. आज दुपारी दोन्ही पहिलवानांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) काँग्रेसमध्ये सामील होईल अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. आता फोगाटने राहुल गांधींची भेट घेतल्याचे समोर आल्याने या चर्चांना बळ मिळालं आहे. राजकीय वर्तुळातील चर्चा ऐकल्या तर विनेशला दादरी मतदारसंघातून तिकीट दिलं जाऊ शकतं. तर बजरंग पुनिया बादली मतदारसंघातून इच्छुक आहेत. पण काँग्रेस त्यांना एखाद्य जाट बहुल मतदारसंघातून निवडणुकीत उतरवण्याची तयारी करत आहे.

हरियाणात ‘आप’ कमकुवत तरीही आघाडीसाठी काँग्रेसचा आग्रह

Congress Party विनेशच्या एन्ट्रीने राजकारण बदलणार

विनेश फोगाटची राजकारणातील एन्ट्री राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणू शकतो. खाप पंचायत आणि शेतकऱ्यांचा फोगाटला असलेला पाठिंबा पाहता निवडणुकीत याचा फायदा मिळू शकतो. असं असलं तरी विनेश फोगाटने अजून तरी राजकारणातील प्रवेशाची घोषणा केलेली नाही. जर आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विनेशने राजकारणात पदार्पण केलं तर राज्याच्या राजकारणाला एक वेगळी दिशा देणारी ही घटना ठरू शकते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img