23.1 C
New York

Udhav Thackrey : ठाकरेंचे २२ शिलेदार विधानसभेसाठी तयार, पहिली संभाव्य यादी आली समोर

Published:

Udhav Thackrey : शिवसेना पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे.लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना 22 पैकी 9 जागा जिंकल्या होत्या.हे यश ज्या कॉन्फिडन्सने ठाकरेंनी महाविकास आघाडीत जागांची डिमांड केली होती.त्याप्रमाणात जिंकलेल्या जागा यथातथाच होत्या.काँग्रेसने 17 पैकी 13 जागा जिंकत सुपरस्ट्राईकने आघाडीत आपण मोठा भाऊ असल्याचं दाखवून दिले.

पण आता पुन्हा एकदा विधानसभेला उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) जोर लावला आहे. यात मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला अजून फिक्स नसतानाच शिवसेना ठाकरे गटाने आपल्या संभाव्य उमेदवारांची यादीही तयार केल्याची चर्चा आहे.सध्या 22 उमेदवारांची नावांची यादी समोर आली आहे.

विश्वजीतचं’ कौतुक अन् पाठीवर हातही, पवारांनी दिला खंबीर साथीचा शब्द…

मुंबईत 36 विधानसभा मतदारसंघ आहेत.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वापासून ते उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळापर्यंत शिवसेनेनं (Shivsena) मुंबईसाठी कायमच ताकद लावली आहे. मुंबईतील जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी युती असो वा आघाडी, लोकसभा असो की विधानसभा निवडणुका ठाकरेंकडून दबावतंत्र वापरण्यात येते.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने गेल्या विधानसभा निवडणुकीत 14 जागांवर विजय मिळवला होता. मुंबई हा ठाकरेंचा बालेकिल्ला आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे तीन जागा जिंकल्या होत्या. तर चौथ्या जागेवर निसटता पराभव झाला होता. त्यामुळे ठाकरेंचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक ही ठाकरे गटासाठी जास्त महत्त्वाची आहे.

संभाव्य उमेदवारांची यादी
वरळी मतदारसंघ – आदित्य ठाकरे
दहिसर – तेजस्विनी घोसाळकर
वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई
दिंडोशी – सुनील प्रभू
विक्रोळी – सुनील राऊत
अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके
कलिना – संजय पोतनीस
कुर्ला – प्रविणा मोरजकर
वडाळा – श्रद्धा जाधव
जोगेश्वरी- अमोल कीर्तिकर
चारकोप – नीरव बारोट
गोरेगाव – समीर देसाई
भांडूप – रमेश कोरगांवकर
चांदिवली – ईश्वर तायडे
दादर-माहिम – सचिन अहिर, विशाखा राऊत
वर्सोवा – राजू पेडणेकर/ राजूल पटेल
शिवडी – अजय चौधरी/ सुधीर सालवी
भायखळा – किशोरी पेडणेकर/ जामसुतकर/ रहाटे
चेंबूर – अनिल पाटणकर/ प्रकाश फार्तेपेकर
अणुशक्तीनगर – विठ्ठल लोकरे / प्रमोद शिंदे
घाटकोपर – सुरेश पाटील
मागाठाणे – विलास पोतनीस / सुदेश पाटेकर/ संजना घाडी ⁠

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img