गणेशोत्सवासाठी फक्त दिवस बाकी असल्याने मुंबईतील गणेशभक्त कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. (Mumbai Goa Highway) मात्र त्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. कोकणात जाण्यासाठी हजाराच्या आसपास एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत. मात्र ज्यांना एसटी बसचे आणि रेल्वेचे तिकीट मिळाले नाही, असे गणेशभक्त स्वत: गाडी करून जात आहेत. कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या अचानक वाढल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. अलिबाग जवळील लोणारे परिसरात सहा ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (Heavy traffic jam on Mumbai Goa highway due to Ganesha devotees going to Konkan)
गणेशोत्सवासाठी फक्त एक दिवस बाकी आहे, तर दुसरीकडे राज्य सरकारने कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी टोलमाफी दिली आहे. मात्र गणेश भक्तांनी मंगळवार रात्रीपासूनच कोकणाच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. याशिवाय राज्य सरकारकडून अतिरिक्त दीड हजार एसटीच्या बसेस सोडण्यात आल्या आहेत. मात्र लोणेरे येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक सर्विस रोडच्या अरुंद रस्त्यावरून सुरू आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून अचानक वाहनांची संख्या वाढल्यामुळे आज पहाटेपासूनच मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
Mumbai Goa Highway बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतुक कोंडीत भर
दरम्यान, प्रशासनाने गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी 600 हून अधिक पोलीस आणि गृहरक्षक दलाचे जवान मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी तैनात केले आहेत. तसेच या महामार्गावर मोटर सायकल पेट्रोलिंगही होताना दिसत आहे. वाहतूक कोंडीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे तैनात ठेवण्यात आले आहेत. तसेच माणगाव आणि इंदापूर येथे एसटीच्या बसेसमुळे दरवर्षी होणारी कोंडी लक्षात घेऊन येथील बस स्थानक तात्पुरते स्वरूपात शहराबाहेर हलवण्यात आली होती. मात्र त्यानंतरही कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या दोन्ही मार्गीकेवर कोकणात जाणाऱ्या गाड्या आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडीच्या समस्येत अधिकच भर पडली आहे. वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न करूनही लोणारे परिसरातील वाहतूक कोंडी सुरळीत होताना दिसत नाही.
Mumbai Goa Highway मुंबईतून कोकणात जाण्यासाठी पर्यायी मार्ग
मुंबई गोवा महामार्ग (मुंबई- नवीमुंबई-पनवेल-महाड)
मुंबई-वाशी-पामबीच-उरणफाटा- खारपाडा- वडखळ-महाड
मुंबई पुणे दृतगती मार्ग(मुंबई- खालापुर- पेण- महाड)
मुंबई पुणे दृतगती मार्ग( मुंबई-खालापुर- पाली- वाकण- माणगाव- महाड)
मुंबई पुणे दृतगती मार्ग (सातारा- उंब्रज- पाटण- चिपळुण)
मुंबई पुणे दृतगती मार्ग( सातारा- कराड- कोल्हापुर- राधानगरी मार्गे कणकवली)
मुंबई पुणे दृतगती मार्ग (सातारा- कराड- कोल्हापुर- आंबोली मार्गे सावंतवाडी)
मुबईतून अटल सेतू मार्गे पळस्पे येथून मुंबई गोवा महामार्ग