26.6 C
New York

Otur : ओतूर पोलिसांनी गहाळ झालेले २३ मोबाईल मूळ मालकांना केले परत

Published:

ओतूर,प्रतिनिधी: रमेश तांबे

ओतूर (Otur) पोलिसांनी गहाळ झालेले २३ मोबाईल मूळ मालकांना केले परतपुणे ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस स्टेशन हद्दित गहाळ झालेले मोबाईलचा शोध घेण्यात ओतूर पोलिसांना यश आले असून ओतूर पोलिसांनी गाळ झालेले २३ मोबाईल मूळ मालकांचा शोध घेऊन ते मूळ मालकांना परत केले सदर मोबाईलची किंमत सुमारे तीन लाख रूपये असल्याचे ओतूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी सांगितले.

या कामगिरीबद्दल ओतूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी एक पथक नेमण्यात आले असून गहाळ मोबाईलचा तांत्रिकदृष्ट्या माहीती प्राप्त करून शोध घेतला असता वनप्लस,विवो, सॅमसंग,रेडमी,ओपो अशा विविध कंपनी मॉडेलचे एकुण २३ मोबाईल असा सुमारे तीन लाख रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याप्रमाणे मिळुन आलेले मोबाईल  तक्रारदार नागरीक यांना वाटप करण्यात आले आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे स.पो.नि. लहु थाटे, पो. हवा. महेश पटारे,पो.हवा.भरत सुर्यवंशी,पो.हवा. बाळशीराम भवारी,पो.हवा.नदीम तडवी,पो.हवा.नामदेव बांबळे,पो.हवा.दिनेश साबळे,पो.हवा.आनंदा भवारी,पो.हवा. सुरेश गेंगजे,पो.कॉ.ज्योतीराम पवार, पो.कॉ. मनोजकुमार राठोड,पो.कॉ.आर.के.बोंबले तसेच सायबर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथील पो. हवा.महेश गायकवाड, पो.ना.सुनिल कोळी, पो.कॉ.चेतन पाटील, पोलीस पाटिल किरण भोर डुंबरवाडी, राहुल हांडे, विजय पावडे, अमीत ठोसर व पोलीस मित्र छोटु मणियार यांनी केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img