8.9 C
New York

Sanjay Raut : जयदीप आपटेला त्याचे बॉस वाचवू शकले नाहीत; राऊतांचा निशाणा कोणाला ?

Published:

नौदल दिनानिमित्त गेल्यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. पण 26 ऑगस्ट 2024 रोजी हा पुतळा कोसळला. यानंतर शिल्पकार जयदीप हाही फरार झाला होता. विरोधक आक्रमक झाले होते आणि ते सरकारला त्यामुळे वारंवार महायुती सरकारला घेरताना दिसले. अशातच दोन आठवड्यांपासून फरार असलेल्या शिल्पकार जयदीप आपटेला बुधवारी (4 सप्टेंबर) रात्री पोलिसांनी अटक केली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी आता पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. (Sanjay Raut alleged that his boss could not save sculptor Jaideep Apte in Chhatrapati Shivaji Maharaj statue disaster)

जयदीप आपटेच्या अटकेवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेनंतर शिवभक्तांचा राज्य सरकारवर दबाव आणि एवढा रेटा होता की, जयदीप आपटेला त्याचे बॉस वाचवू शकले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भता या राज्यात जे घडलं ते यापूर्वी कधीचं घडलं नव्हतं. जयदीप आपटे याच्यापेक्षा ज्यांनी त्यांना हे काम अनुभव नसताना दिलं, ते बेकायदेशी होतं. ते सूत्राधार आजही सरकारमध्ये आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी होणार? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

देवेंद्र फडणवीस अन् मनोज जरांगेंची फोनवर चर्चा

जयदीप आपटे याला अटक होण्याआधी सिंधुदुर्गच्या न्यायालयात त्याच्या जामिनाची तयारी आठ दिवसांपासून सुरू आहे. यासाठी ठाण्यातून सूत्र हलत आहेत. मी वारंवार उल्लेख करत होतो की, जयदीप आपटे दोन दिवसांमध्ये सरेंडर होतील आणि ताबडतोब त्यांच्या जामिनाची व्यवस्था करा, अशाप्रकारची सूत्र ठाण्यातून हलत आहेत. त्यासंदर्भात कायदेशीर जी मदत लागते ती सुद्धा ठाण्यातून मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ज्याने बाजार मांडला आणि केला त्या सगळ्या षडयंत्राचे सूत्रधार ठाण्यात आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

जयदीप आपटे हा फक्त मोहरा आहे की या प्रकरणात अजून छोटे-मोठे मासे आहेत, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर संजय राऊत म्हणाले की, लहान-मोठे मासे असा या प्रकरणात प्रश्न नाही. आम्ही या प्रकरणात राजकारण करू इच्छित नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमानानंतर राज्यात जी स्थिती निर्माण झाली. त्यानंतर लोकभावना दडपण्याचा जो प्रयत्न झाला, तो कोणालातरी पाठीशी घालण्यासाठी झाला. या संपूर्ण कामात झालेला भ्रष्टाचार दडपण्यासाठी जो प्रयत्न झाला त्याला आमचा विरोध आहे. कोट्यावधी रुपयाचं काम कंत्राट माध्यमातून दिल्यावर प्रत्यक्षात काम 20 ते 25 लाखात आटपल्याचं पाहायला मिळत आहेत. पुतळ्यासाठी मंजूर झालेला खर्च आणि झालेल्या कामातील तफावत पाहिली तर लक्षात येईल की, पुतळा कमी प्रतिचा झाला. मात्र मुख्यमंत्री म्हणतात, पुतळा 45 किमी ताशी वेगाने पडला, असे म्हणते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img