8.9 C
New York

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस अन् मनोज जरांगेंची फोनवर चर्चा

Published:

राज्याच्या राजकारणात आज एक मोठी घडामोड घडली आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर राज्य सरकारविरोधात मोर्चा उघडलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची मंत्री अब्दुल सत्तार यांनी (Abdul Sattar) भेट घेतली. दोन्ही नेत्यांत तब्बल तीन तास चर्चा झाली. या चर्चेदरम्यानच मनोज जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

मराठवाड्यात पावसानं मोठं नुकसान झालं आहे. नुकसानीची पाहणी करताना मी सांगितलं होतं की याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतो. त्यानुसार फडणवीसांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी लागेल. उद्या कॅबिनेट बैठक आहे त्यात याबाबत निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितल्याचे फडणवीस म्हणाल्याचे जरांगेंनी सांगितलं.

राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर

मंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी रात्री जरांगेंची भेट घेतली. जरांगे पाटील यांनी मंत्री सत्तार यांचे स्वागत केले. यावेळी दोन्ही नेत्यांत तीन तास चर्चा झाली. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आमच्यात चर्चा झाली. आता आमच्यात जी चर्चा झाली त्याची माहिती मी कॅबिनेट बैठकी देणार आहे असे मंत्री सत्तार म्हणाले.

या भेटीनंतर जरांगे पाटील म्हणाले, पावसामुळे झालेल्या नुकसानीची मी स्वतः पाहणी केली. या संकटाने शेतकरी पुरता खचून गेला आहे. सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज असल्याचे सांगितले. याच मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा झाली. शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी लागेल. उद्या कॅबिनेट बैठक आहे त्यात याबाबत निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितल्याचे जरांगे म्हणाले.

Devendra Fadnavis महायुती सरकारची सावध रणनीती

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात मोठा फटका बसला होता. राज्यातील अनेक मतदारसंघात मराठा आंदोलनाचा परिणाम झाल्याचे दिसून आले होते. आता विधानसभेलाही याचा फटका बसू शकतो याची जाणीव असल्याने महायुती सरकारने मराठा आंदोलकांचा रोष कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंत्री सत्तार यांनी मनोज जरांगेंची भेट घेतल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. याकामी अब्दुल सत्तार यांनी घेतलेला पुढाकार यशस्वी ठरणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img